भोरच्या उपविभागीय पोलीस अधिकारीपदी राजेंद्रसिंह गौर
वालचंदनगर:- राजगड ,भोर
उपविभागीय पोलीस अधिकारी पदी नुकतीच राजेंद्रसिंह गौर यांची नियुक्ती करण्यात आली. राजेंद्रसिंह गौर हे चाकण-आळंदी येथे सहाय्यक पोलीस आयुक्तपदाची उत्तमप्रकारे धुरा सांभाळत होते. त्यांच्या या कार्यकाळात त्यांनी अनेक गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्या. तसेच शांतता व सलोखा राहण्यासाठी सदैव प्रयत्नशिल राहिले. नुकत्याच झालेल्या आषाढी वारीसाठी आळंदी येथील पालखी बंदोबस्ताच्या नियोजनाचे त्यांनी उत्तमप्रकारे कार्य केले.
राजेंद्रसिंह गौर हे मुळचे नांदेड जिल्ह्यातील असुन ते स्पर्धा परिक्षेतून १९९२ साली पोलीस उपनिरीक्षक पदावर रूजू झाले. त्यांनी सुरूवातीला लातुर जिल्ह्यातील किल्लारी भुकंपात महत्वपुर्ण कामगिरी केली. त्यांनी महाराष्ट्रातील परभणी, लातुर, नांदेड, लाचलुचपत विभाग सोलापुर, ए.टी.एस. औरंगाबाद तसेच स्थानिक गुन्हे शाखा जालना, क्राईम ब्रँच पिंपरी चिंचवड येथे उत्कृष्ट सेवा बजावली त्यानंतर त्यांटी नियुक्ती उपविभागीय अधिकारी अक्कलकोट येथे झाली येथेही त्यांनी उत्कृष्ट कामगिरी केली. येथील कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर त्यांची चाकण येथे बदली झाली. तेथे त्यांनी अनेक महत्वपुर्ण गुन्ह्यांचा तपास केला. त्यांनी केलेल्या या चांगल्या कार्यामुळे त्यांना राष्ट्रपती पदकाने सन्मानीत करण्यात आले आहे. त्यांची भोर या विभागात नियुक्ती झाल्याने त्यांनी भविष्यात कायदा व सुव्यवस्था चांगले राहण्यासाठी व गुन्हेगारीला व खासगी सावकारिला आळा घालून सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडविणार असल्याचे व महामार्गावरील वाहतुक कोंडीच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे बोलताना सांगतिले.
Back to top button
×
No WhatsApp Number Found!