कन्नड साहित्य परिषद, बेंगळुर यांच्या कडून दरवर्षी देण्यात येणाऱ्या सिसु संगमेश दत्ति पुरस्कार यंदा बाल साहित्यिक तथा जिल्हा परिषद कन्नड शिक्षक मलिकजान शेख यांना मिळाला आहे.*
बाल साहित्यिक मलिकजान शेख यांना सिसु संगमेश दत्ति पुरस्कार जाहीर.

*बाल साहित्यिक मलिकजान शेख यांना सिसु संगमेश दत्ति पुरस्कार जाहीर.

*🔶अक्कलकोट :* (प्रतिनिधी)
*कन्नड साहित्य परिषद, बेंगळुर यांच्या कडून दरवर्षी देण्यात येणाऱ्या सिसु संगमेश दत्ति पुरस्कार यंदा बाल साहित्यिक तथा जिल्हा परिषद कन्नड शिक्षक मलिकजान शेख यांना मिळाला आहे.*


दरवर्षि कन्नड भाषेत प्रसिद्ध होणाऱ्या बाल साहित्या मधील उत्कृष्ट बालकविता, बालकथा व बाल कादंबरी या कृतीला कन्नडचे प्रसिद्ध बाल साहित्यिक सिसु संगमेश यांच्या स्मरणार्थ ‘सिसु संगमेश दत्ति’ पुरस्कार कन्नड साहित्य परिषदेच्या वतिने देण्यात येतो.

तर केंद्र कन्नड साहित्य परिषदचे अध्यक्ष नाडोज डॉ.महेश जोशी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या निवड समितीत मलिकजान शेख यांचे बाल कविता संग्रह “चिलिपिली” या उत्कृष्ट बाल कविता कृतीला ‘सिसु संगमेश दत्ति’ पुरस्कारासाठी निवड करण्यात आले असून दिनांक १२ मार्च २०२३ रोजी विविध मान्यवरांचे उपस्थित बेंगळुर येथे हा पुरस्कार सोहळा संपन्न होणार आहे.

बाल साहित्यिक मलिकजान शेख यांना पुरस्कार मिळाल्याबद्दल कन्नड साहित्य परिषद महाराष्ट्र घटकचे अद्यक्ष सोमशेखर जमशेट्टि, जेष्ट साहित्यीका डॉ. मधुमाल लिगाडे, कन्नड साहित्य परिषदचे जत तालुकाध्यक्ष डॉ.आर. के.पाटील, गझल साहिती गिरीश जकापुरे, राजशेखर उमराणिकर, विद्याधर गुरव, शरणप्पा फुलारी, बसवराज धनशेट्टी, गुरुबसु वग्गोली, महेश म्हेत्री आदिनी अभिनंदन व शुभेच्या दिल्या.