गावगाथा

*अक्कलकोट शहरात मोहरम शांततेत अति उत्साहात व भक्तिमय वातावरणात संपन्न.

मोहरम

*अक्कलकोट शहरात मोहरम शांततेत अति उत्साहात व भक्तिमय वातावरणात संपन्न.*

HTML img Tag Simply Easy Learning    


अक्कलकोट: (सोहेल फरास)अक्कलकोट शहरातील मोहरम निमित्त पंजे व ताबूत काढण्यात आलेल्या विसर्जन मिरवणुका अत्यंत शांततेत आणि अति उत्साहात व भक्तिमय वातावरणात काढण्यात आल्या.
अक्कलकोट शहरातील मौलाली गल्ली माणिक पेठ बुधवार पेठ खासबाग गल्ली आणि नाईकवाडी गल्ली येथून गल्ली येथून परंपरेनुसार पण जेवली काढण्यात आले.
पोलीस प्रशासनाने दिलेल्या नियमाचा पालन करून व वेळेचा पालन करून रात्री १०:०० वाजता संपूर्ण अक्कलकोट शहरातील पंजे मिरवणुका विसर्जन करण्यात आले.
यंदाच्या वर्षी अक्कलकोट शहरातील मोहरम कमिट्या कडून अनावश्यक खर्च टाळून आपापल्या मंडळातर्फे मोहरमच्या दहा दिवसांमध्ये विविध कार्यक्रम व प्रसाद (लंगर) ठेवण्यात आले होते.मोहरम निमित्त दर्शनासाठी व नैवेद्य घेऊन येणाऱ्या भाविकांनी या प्रसादाचा व लंगर चा लाभ घेतला.
अक्कलकोट शहरातील मौलाली गेली येथे भाविकांसाठी मौलाली पंजे व सय्यद खाशीम पंजे तर्फे मौलाली गल्ली यंग कमिटी कडून तीन दिवस भक्तांसाठी सकाळी आणि रात्री दोन वेळेस प्रसाद (लंगर) ठेवण्यात आले होते.
अक्कलकोट शहरातील मुजावर गल्ली येथे बसवण्यात येणार १२५ ते १५० वर्षापासून बसविण्यात येणारे ताबूत (डोली) यंदाच्या वर्षी मोडीत काढण्यात आली.
अक्कलकोट शहरातून मुजावर गल्लीने घेतलेल्या १२५ते १५० वर्षांपासून पारंपारिक पद्धतीने बसविण्यात येणाऱ्या डोली यावर्षी न बसवल्यामुळे अक्कलकोट शहरातील अनेक लोकांकडून व भक्तांकडून नाराजी व्यक्त करण्यात आली.
अक्कलकोट शहरातून निघालेल्या पंजे व डोली मिरवणुकी पाहण्यासाठी आलेल्या भाविकांना अक्कलकोट शहरातील मौलाली गल्ली यंग कमिटी कडून(मौलाली गल्ली), व अशपाक भाई बळोरगी मित्र परिवाराच्या वतीने (मच्छी मार्केट), नगरसेवक सद्दाम शेरीकर परिवाराच्यावतीने (कारंजा चौक), व मुजावर गल्ली मित्र परिवाराच्या वतीने (सेंट्रल चौक) येथे ठीक ठिकाणी शरबत व मसाला दूध वाटप करण्यात आले.
*♦️ यंदाच्या वर्षी मोहरम मिरवणुकीमध्ये लक्षवेधी ठरले ते नगरसेवक सद्दाम शेरीकर यांचे एस एस पैलवान लेझीम संघ अक्कलकोट.*
नगरसेवक सद्दाम शेरीकर यांनी यंदाच्या वर्षी प्रथमच अक्कलकोट शहरात मोहरमचे औचित्य साधून अक्कलकोट शहरातील सर्व तरुणांना एकत्र करून एक लेझीम संघ तयार केला आणि संपूर्ण तरुणांना पंधरा ते वीस दिवस लेझीम सराव घेऊन तरुणांना लेझीम खेळण्यासाठी प्रोत्साहन केले आणि त्या प्रोत्साहनाला तरुणांनी कालच्या मिरवणुकीमध्ये शंभर टक्के प्रतिसादही दिला.
अक्कलकोट शहरातील मिरवणुका पाहण्यासाठी व नगरसेवक सद्दाम शेरीकर यांनी कारंजा चौक येथे ठेवण्यात आलेल्या शरबत वाटपचा कार्यक्रमाच्या उद्घाटन व शरबत वाटप साठी अक्कलकोट तालुक्यातील विविध मान्यवर स्टेजवर आले होते, प्रमुख मान्यवरांचा स्वागत व सत्कार नगरसेवक सद्दाम शेरीकर मित्र परिवाराच्या वतीने करण्यात आला.
या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती माझी गृहराज्यमंत्री सिद्धाराम जी म्हेत्रे साहेब ,रमेश पाटील,महेश हिंडोळे,मल्लू पाटील,यशवंत धोंगडे,एपीआय निलेश बागव, सुरेश सूर्यवंशी, पत्रकार अल्ताफ पटेल,मिलन कल्याणशट्टी,अशपाक बळोरगी, अविनाश मडीखांबे,अतिश मोरे,मुत्तू खेडगी,आदी मान्यवर उपस्थित होते.
✍️ सोहेल फरास अक्कलकोट

HTML img Tag Simply Easy Learning    

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button