गावगाथा

प्रतिभा निकेतन इंग्लिश स्कूलचा वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा

वार्षिक संमेलन

प्रतिभा निकेतन इंग्लिश स्कूलचा वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा
मुरूम, ता. उमरगा, ता. ६ (प्रतिनिधी) : येथील प्रतिभा निकेतन इंग्लिश स्कूलचा वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या वार्षिक स्नेहसंमेलनाचे उद्घाटन उमरगा जनता सहकारी बँकेचे चेअरमन शरण पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी संस्थेचे सचिव व्यंकटराव जाधव, पोलीस उपनिरीक्षक नवनाथ गाडेकर ,
प्राचार्य अशोक सपाटे, सामाजिक कार्यकर्ते नंदकिशोर लोहिया, माजी प्राचार्य सच्चिदानंद अंबर, प्रा. डॉ. पुरुषोत्तम बारवकर, संगमेश्वर लामजने, धनराज हाळळे, मुख्याध्यापिका अनुराधा जोशी आदींचे प्रमुख उपस्थिती होती.
विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी विविध गाण्यावर आपले कलाविष्कार यावेळी सादर केले. मराठी-हिंदी
बालगीते, लावणी, लोकगीते, भरतनाट्यम्, कोळीगीते, लेझीम, आदिवासी नृत्य, पंढरपूरची वारी, टिपरी, देशभक्तीपर गीतांवर नृत्य, रिमिक्स गाणी, विविध वेशभूषा सादर करून शाळेतील विद्यार्थ्यांनी जल्लोष साजरा केला. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने करण्यात आले.‎ कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सहशिक्षक विरेंद्र लोखंडे, सुभाष धुमाळ, पंकज पाताळे, सागर मंडले, सहशिक्षिका संगीता देशमुख, नेहा माने, अश्विनी क्षीरसागर, शितल घोडके, तनुजा जमादार, प्रभावती कलशेट्टी, साधना शेवाळकर, गीता सत्रे, सरस्वती जाधव, सरोजा सारणे, सोनाली कारभारी, सुधाराणी शेळके, श्रीदेवी मंडले, पुजा मरबे, इंदिरा व्हट्टे आदींनी परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचलन सहशिक्षक जगदीश सुरवसे, विदयार्थी समृद्धी खददे, वेदीका मुर्डे, धानेश्वरी धनुरे तर दृष्टी चौधरी आभार यांनी मानले. यावेळी शहर व परिसरातील पालक, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. फोटो ओळ : मुरूम, ता. उमरगा येथील प्रतिभा निकेतन इंग्लिश स्कूलच्या स्नेहसंमेलनाप्रसंगी नृत्य सादर करताना बालकलाकार

HTML img Tag Simply Easy Learning    

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button