स्वामी समर्थ वटवृक्ष मंदिर

स्वामी भक्ती प्रसार कार्यास महेश इंगळेंचे खूप मोठे योगदान

स्वामी समर्थ फेम अक्षय मुडावदकर यांचे भावोद्गार

स्वामी भक्ती प्रसार कार्यास महेश इंगळेंचे खूप मोठे योगदान

स्वामी समर्थ फेम अक्षय मुडावदकर यांचे भावोद्गार

(दि.१/५/२३) – शब्द संकलन – श्रीशैल गवंडी) ———– अनंत कोटी ब्रम्हांडनायक असलेले अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराजांचे मूळस्थान म्हणजे येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान होय. वटवृक्ष मंदिरातील वटवृक्षाखाली बसून स्वामी समर्थांनी भाविकांना विविध माध्यमातून आपल्या जागृततेच्या अनेक प्रचिती देत आहेत. श्री वटवृक्ष मंदिर समितीचे अध्यक्ष महेश इंगळे यांनीही अध्यात्माची कास धरून मंदिर समितीची वाटचाल चालू ठेवली आहे. या मार्गक्रमणातून त्यांनी मंदिरातील गाभारा सुशोभीकरण, परिसर सुशोभीकरण यासह विविध विकास कामे करून वटवृक्ष मंदिराची शोभा वाढविली आहे. आम्ही तर केवळ स्वामींच्या ‘जय जय स्वामी समर्थ’ मालिकेच्या माध्यमातून स्वामींचे चरित्र भाविकांसमोर मांडण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु स्वामी समर्थांचे मूळस्थान असलेल्या येथील श्री वटवृक्ष स्वामी समर्थांच्या कीर्तीचा विस्तार सोशल मीडियाला हाताशी घेऊन महेश इंगळे करीत आहेत. त्यामुळे स्वामी समर्थांच्या या मूळस्थानाचे महत्व, महती व स्वामीभक्ती जास्तीत जास्त भाविकांपर्यंत पोहोचत आहे, म्हणून आमच्यापेक्षा स्वामीभक्ती प्रचार प्रसार कार्यास महेश इंगळे यांचेच योगदान खूप मोठे असल्याचे
मनोगत कलर्स मराठी वाहिनीवरील प्रसिध्द ‘जय जय स्वामी समर्थ’ या मालिकेतील स्वामींची भूमिका साकारलेले कलाकार अक्षय मुडावदकर यांनी व्यक्त केले.
नुकतेच ‘जय जय स्वामी समर्थ’ या मालिकेतील कलाकार श्रीक्षेत्र अक्कलकोट येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरास भेट देऊन श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेतले. याप्रसंगी मंदिर समितीच्या वतीने समितीचे चेअरमन नगरसेवक महेश इंगळे यांनी स्वामी समर्थ फेम अक्षय मुडावदकर व सहकलाकारांचा श्री स्वामी समर्थांचे कृपा वस्त्र, प्रसाद, प्रतिमा देऊन वटवृक्ष मंदिरात यथोचित सन्मान केला. याप्रसंगी स्वामी समर्थ फेम अक्षय मुडावदकर बोलत होते. पुढे बोलताना मुडावदकर यांनी भविष्यकाळात ही इंगळे परिवाराकडून जास्तीत जास्त स्वामी भक्तीचा विस्तार जागतिक पातळीवर विस्तारित व्हावा याकरिता स्वामी समर्थांचे आशीर्वाद व आमच्या शुभेच्छा महेश इंगळे यांच्या पाठीशी असल्याचे मनोगत व्यक्त केले. यावेळी ‘जय जय स्वामी समर्थ’ या मालिकेतील श्री स्वामी समर्थांची भूमिका साकारलेले अक्षय मुडावदकर, चोळाप्पा- स्वानंद बर्वे, दाजीबा- आनंद प्रभू, चंदा- विजया बाबर, नर्सप्पा-बलराम माने, धामिनी-वर्षा घाटपांडे, दिग्दर्शक- दिनकर फसाटे, देवगिरी-सुनीता, नित्य पवार, सुमुख-अनुज ठाकरे, सुंदरा-माधवी सोमन, येसु-अक्षता नाईक, राधाअक्का- नीता, पेंडसे, राणी- वासंतीक वाळके, मंदिर समितीचे सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, श्रीशैल गवंडी, व्यंकटेश पुजारी, संजय पवार, श्रीकांत मलवे, गणेश इंगळे, प्रसाद सोनार, विपुल जाधव, गिरीश पवार, सागर गोंडाळ, आदींसह भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

फोटो ओळ – जय जय स्वामी समर्थ मालिकेतील कलाकार अक्षय मुडावदकर व सहकलाकारांचा वटवृक्ष मंदिरात सत्कार करताना महेश इंगळे दिसत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button