समर्थांवरील श्रध्देय भक्ती भावनेने वटवृक्ष मंदिर समितीस आवश्यक ते सहकार्य करण्यास कटीबद्ध – केंद्रीय मंत्री रक्षा खडसे
(अ.कोट,श्रीशैल गवंडी. दि.२२/०६/२०२५) – येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान हे श्री स्वामी समर्थांचे मूळस्थान आहे. अलीकडील काळात स्वामी भक्तांची संख्या वाढत चालली आहे. या कारणाने येथील वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानास येणाऱ्या भाविकांची संख्याही वाढत चालली असल्याचे आपणास समजले आहे. मंदिराच्या मर्यादित परिसरात मंदिर समितीचे चेअरमन महेश इंगळे यांनी उदात्त स्वामी सेवेच्या दिनक्रमाने स्वामी भक्तांच्या सेवेत नित्यपणे कार्यरत आहेत. हे ऐकून खूप समाधान झाले. गर्दी कितीही असू द्या त्यांचे वैविध्यपूर्ण नियोजन हे मंदिर समितीचे ठळक वैशिष्ट्य आहे. प्रसंगास अनुसरून निर्णय घेण्याची क्षमता मंदीर समितीकडे आहे म्हणून वटवृक्ष मंदिरातील गर्दीच्या कालावधीतही मंदीर समितीचे वटवृक्ष मंदिरातील नियोजन उत्तम व शिस्तबद्ध असते. म्हणून स्वामी समर्थांवरील श्रद्धेय भक्ती भावनेने वटवृक्ष मंदिर समितीस आवश्यक ते सहकार्य करण्यास आपण नेहमीच कटिबद्ध असल्याचे मनोगत
केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांनी व्यक्त केले. ते नुकतेच येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरास आज भेट देऊन अत्यंत विनम्रभावे मंदिर परिसराची पाहणी करत व मंदिरातील भाविकांसाठी असलेल्या सोयी सुविधांबद्दल जाणून घेऊन श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेतले. यावेळी मंदिर समितीच्या वतीने समितीचे चेअरमन महेश इंगळे यांनी केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांचा श्री स्वामी समर्थांचे कृपावस्त्र, प्रसाद, प्रतिमा देऊन यथोचित सन्मान केला. यावेळी केंद्रीय मंत्री रक्षा खडसे बोलत होत्या. पुढे बोलताना केंद्रीय मंत्री खडसे यांनी महेश इंगळे यांच्या स्वामी सेवेच्या कार्यास आपला सदैव पाठिंबा असल्याचे मनोगतही व्यक्त केले. याप्रसंगी प्रथमेश इंगळे, मिलनदादा कल्याणशेट्टी, बसलिंगप्पा खेडगी, महेश हिंडोळे, दयानंद बिडवे, प्रदीप पाटील, लखन झंपले, प्रा.शिवशरण अचलेर सर, नागराज कुंभार, मंदिर समितीचे सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, श्रीशैल गवंडी, गिरीश पवार, विपुल जाधव, श्रीकांत मलवे, प्रसाद सोनार, आदींसह भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते उपस्थित होते.
फोटो ओळ – केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांचा वटवृक्ष मंदिरात सत्कार करताना महेश इंगळे, मिलनदादा कल्याणशेट्टी, बसलिंगप्पा खेडगी, महेश हिंडोळे, दयानंद बिडवे,
प्रदीप पाटील, लखन झंपले, प्रा.शिवशरण अचलेर सर, नागराज कुंभार आदी दिसत आहेत.
Back to top button
×
No WhatsApp Number Found!