अमोलराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली सुरु असलेली विकास कामे तीर्थ क्षेत्र अक्कलकोटच्या विकासाला चालना देणारे ; राज्याच्या नगर विकास विभागाचे कक्ष अधिकारी विलासराव धाईंजे

अक्कलकोट : (प्रतिनिधी)
श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली सुरु असलेली विकास कामे तीर्थ क्षेत्र अक्कलकोटच्या विकासाला चालना देणारे असून राज्याच्या नगर विकास विभागाकडून विकास कामांकरिता न्यासाला सहकार्य करू असे मनोगत राज्याच्या नगर विकास विभागाचे न.वि. १८ चे कक्ष अधिकारी विलासराव धाईंजे यांनी व्यक्त केले.
ते श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळात आले असता न्यासाचे सचिव शामराव काका मोरे यांच्या हस्ते श्रींची प्रतिमा, कृपावस्त्र, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. या वेळी ते बोलत होते.
त्यांच्या समवेत अक्कलकोट नगरपरिषदेचे मुख्याधिकारी सचिन पाटील, न.प. आरेखक, मलिक बागवान, विठ्ठलराव तेली उपस्थित होते.
यावेळी, न्यासाचे पुरोहित संजय कुलकर्णी, सौरभ मोरे, आप्पा हंचाटे, बाबुशा महिंद्रकर, अमित थोरात, एस.के. स्वामी, शावरेप्पा माणकोजी, सिद्धाराम कल्याणी, विनायक तोडकर, महादेव अनगले, धनप्पा उमदी, मल्लिकार्जुन बिराजदार, सतीश महिंद्रकर, शहाजीबापू यादव, नामा भोसले, बाळासाहेब घाडगे, श्रीनिवास गवंडी, प्रसन्ना बिराजदार, दत्ता माने, प्रसाद हुल्ले, शरद भोसले, रमेश हेगडे, महांतेश स्वामी, धनंजय निंबाळकर, अनिल बिराजदार, मल्लिनाथ कोगनुरे, लाला निंबाळकर, कल्याण देशमुख यांच्यासह सेवेकरी, कर्मचारी, भक्तगण बहुसंख्येने उपस्थित होते.