महिला शेतकऱ्यांना ड्रोन खरेदीसाठी सोलापूर झेडपी देणार अनुदान
सीईओ कुलदीप जंगम यांनी झेडपीचे 45 कोटीचे मांडले शिलकी बजेट

महिला शेतकऱ्यांना ड्रोन खरेदीसाठी सोलापूर झेडपी देणार अनुदान
सीईओ कुलदीप जंगम यांनी झेडपीचे 45 कोटीचे मांडले शिलकी बजेट

सोलापूर : जिल्हा परिषदेच्या स्वउत्पन्नाचे सन 2025 – 26 चे 45 कोटीचे शिलकी अंदाजपत्रक जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक कुलदीप जंगम यांनी बुधवारी सभेसमोर मांडले.

या अंदाजपत्रकात सीईओ जंगम यांनी सार्वजनिक आरोग्य व कृषी विभागासाठी नाविन्यपूर्ण योजना मांडल्या आहेत आशा वर्करना गर्भवती महिलांना दवाखान्यापर्यंत नेण्यासाठी चाळीस लाखाची तरतूद केली आहे तर कृषी विभागात महिला शेतकऱ्यांसाठी ड्रोन खरेदी करण्यासाठी अनुदान देण्यासाठी “महिला किसान शक्ती पंख योजना’ जाहीर केली असून त्यासाठी पन्नास लाखाची तरतूद केली आहे. अंदाजपत्रकास सभेने एकमताने मंजुरी दिली. सभेला अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर, ग्रामीण विकास यंत्रणेचे डॉ. सुधीर ठोंबरे, प्रसाद मिरकले, मुख्य लेखा व वित्त अधिकारी मीनाक्षी ठोकडे व इतर विभाग प्रमुख उपस्थित होते. शेवटी सचिव तथा उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील यांनी आभार मानले.

असे आहे बजेट….

सोलापूर जिल्हा परिषदेतील स्वउत्पन्नाचे सन २०२४-२५ चे सुधारित व सन २०२५-२६ चे मूळ अंदाजपत्रक सादर करताना सीईओ कुलदीप जंगम यांनी आनंद व्यक्त केला. अंदाजपत्रक तयार करीत असताना सर्व विभाग प्रमुख यांनी केलेल्या सुचना व शिफारशींचा विचार करुन आणि ग्रामीण भागातील जनतेला न्याय देण्याच्या दृष्टीकोनातून हा अर्थसंकल्प अर्थ समितीचे सभापती, तथा प्रशासक, जि.प. सोलापूर या नात्याने मी आपल्या समोर सादर करीत आहे असे ते म्हणाले. भारत सरकार व महाराष्ट्र शासनाच्या विविध विकास योजना जल जीवन मिशन, प्रधानमंत्री आवास योजना, उमेद अभियान, शबरी आवास योजना, स्वच्छ भारत मिशन, राष्ट्रीय आरोग्य अभियान या माध्यमातून बन्याच गोष्टी साध्य होतात. स्थानिक स्वराज्य संस्था स्वउत्पन्नातून सदर योजनेअंतर्गत राहिलेल्या गुणवत्तावाढ तसेच उणीवा भरुन काढण्यात येतात.

सन २०२५-२६ चे मूळ अंदाजपत्रक रक्कम रु.४५०३.९० लक्ष चे सादर करीत आहोत.सर्वांगीण विकास,शाश्वत विकास या शिर्षाखाली आपणासमोर सादर करीत आहे.मुळ अंदाजपत्रकात प्रत्येक विभागासाठी पुरेसा निधी उपलब्ध करून दिलेला आहे. तसेच या अर्थसंकल्पात सामाजिक, आर्थिक व शैक्षणिक दर्जा वाढावा, ग्रामीण जनतेच्या आरोग्यमानामध्ये सुधारणा व्हावी, जिल्हा परिषदेचे आर्थिक सशक्तीकरण व्हावे तसेच शेतीसोबत जोडधंद्याना प्रोत्साहन मिळावे व ग्रामीण जनतेचे जीवनमान उंचावे यासाठी खालील नाविन्यपुर्ण योजना अंतर्भुत केल्या आहेत. या अंदाजपत्रकाद्वारे ग्रामीण विकास साधण्यासाठी सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक व पायाभुत सुविधा या चतुः सुर्वीचा अवलंब करून ग्रामीण जनतेचा सर्वांगीण विकास साधणेस आम्ही कटिबध्द आहोत.

सन २०२५-२६ चे मुळ अंदाजपत्रकातील विभागनिहाय योजना खालीलप्रमाणे आहेत.*
सार्वजनिक आरोग्य विभाग :-
आरोग्य विभागासाठी मागील वर्षीच्या मूळ तरतूदीपेक्षा रक्कम रु.११२.०० लक्ष इतकी वाढ करुन आरोग्य विभागासाठी एकूण र.रु.५१०.०८ लक्ष इतकी तरतूद केलेली आहे.
• आशांना गर्भवती महिलांना बाळंतपणासाठी दवाखान्यात नेणेकरीता खर्च तसेच आशा किट यासाठी रक्कम रु.४०.०० लक्ष इतकी तरतूद केलेली आहे.
• प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी औषधे खरेदीसाठी र.रू.१००.०० लक्ष,
• प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये Labour Room चे आधुनिकीकरणासाठी तसेच Smart PHC करणेसाठी रक्कम रु.५०.०० लक्ष,
• आरोग्य विभागासाठी नाविन्यपूर्ण योजनेंतर्गत गरोदर महिलांसाठी जनईत्री कार्ड, युनिवर्सल डिस्चार्ज कार्ड छपाईसाठी रक्कम रु.२०.०० लक्ष,
• प्रा.आ. केंद्र अंतर्गत उपकेंद्रामधील कार्यरत अर्थवेळ परिचारीका यांना गणवेश, इ. साठी रक्कम रु.१०.०० लक्ष,श्वानदंश लस, सर्पदंश लस खरेदीसाठी रक्कम रु.५०,०० लक्ष,
जिल्हास्तर/तालुकास्तर प्राथमिक आरोग्य केंद्र स्तर/उपकेंद्र स्तर वीज, पाणी, दुरध्वनी, इंधन, कुटुंब कल्याण शस्वक्रिया सर्जन वाहन इंधन साठी रक्कम रु.१२५.०० लक्ष, ग्रामीण जनतेला असाध्य रोगावरील (कॅन्सर, हृदयरोग, किडनी) उपचारासाठी अर्थसहाय्य यासाठी र.रु.२०.०० लक्ष,
प्राथमिक आरोग्य केंद्र / उपकेंद्राकडील जैव घनकचरा विल्हेवाट लावणे यासाठी र.रु.३०.०० लक्ष
• प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत E-OPD प्रणाली साठी रक्कम रु.१०.०० लक्ष इतकी तरतूद करणेत आलेली आहे.
*कृषि विभाग
कृषि विभागासाठी मागील वर्षीच्या मूळ तरतूदीपेक्षा रक्कम रु.१४.०० लक्ष इतकी वाढ करुन कृषिसाठी एकूण र.रु.३८६.०० लक्ष इतकी तरतूद केलेली आहे.
• शेतीच्या विकासासाठी महिला शेतकऱ्यांसाठी महिला किसान शक्तीपंख योजना ही नाविन्यपूर्ण योजना घेतलेली असून त्यासाठी रक्कम रु.५०.०० लक्ष इतकी भरीव तरतूद केलेली आहे. सदर योजनेंतर्गत जिल्हयातील महिला शेतकऱ्यांना ड्रोनद्वारे फवारणी यंत्र अनुदानावर पुरविण्यात येणार आहे.
• कृषि अभियांत्रिकी योजनेंतर्गत ट्रॅक्टर चलित औजारे, रोटाव्हेटर, पल्टी नांगर, पेरणी यंत्र, रोटरी टिलर, विडर यासाठी रक्कम रु.९५.०० लक्ष इतकी भरीव तरतूद करण्यात आलेली आहे. जेणेकरुन सोलापूर जिल्हयातील शेतकऱ्यांना आधुनिक औजारांचा मोठ्या प्रमाणात लाभ होईल.
• शेतकरी यांचेसाठी कडबाकुट्टी, ताडपत्री, मधुमक्षीका पेटी व स्लरी फिल्टर या सुधारित औजारांचा वापर व्हावा, यासाठी रक्कम रु.९५.०० लक्ष इतकी तरतूद केलेली आहे.
• शेतकऱ्यांना कृषि सिंचनासाठी सुधारित औजारे व साधने पुरविणे या योजनेंतर्गत पेट्रोकेरोसिन, ऑईल इंजिन, ५एच.पी. ७.५ एच.पी., ओपनव्हेल पंप संच व तुषार सिंचन यासाठी रक्कम रु.७५.०० लक्ष इतकी तरतूद केलेली आहे.
* शिक्षण विभाग :-
शिक्षण विभागासाठी एकूण र.रु.५२०.२१ लक्ष इतकी तरतूद केलेली आहे.
• सावित्रीबाई फुले मुलींचे वसतीगृह सोलापूर येथे वाचन कक्ष, ग्रंथालय, अॅक्टीवीटी रुम बांधणे यासाठी रक्कम रु.१०.०० लक्ष,
• जि.प. शाळांमध्ये क्रिडा साहित्य उपलब्ध करुन देणेसाठी रक्कम रु.२५.०० लक्ष,
• जि.प. शाळेतील विद्यार्थ्यांना विज्ञान प्रदर्शन / विज्ञान केंद्रास / औद्योगिक क्षेत्रास व व्हर्चुयल फिल्ड ट्रिप आणि वैज्ञानिक दृष्टीकोन निर्माण होण्यासाठी ट्रिप यासाठी रक्कम रु.२०.०० लक्ष,
• जिल्हा परिषद प्राथमिक शाळांच्या देखभाल, दुरुस्ती तसेच शाळेत वीज बचत होणेसाठी सोलर युनिट बसविणे व इतर अनुषंगिक खर्चासाठी रक्कम रु.२४०.०० लक्ष इतकी भरीव तरतूद करणेत आलेली आहे.
समाजकल्याण विभाग
समाजकल्याण विभागासाठी एकूण र.रु.४६१.२८ लक्ष इतकी तरतूद केलेली आहे.
• ग्रामीण भागातील मागासवर्गीयांना शेळीपालन गट, गाई। म्हैस खरेदी साठी अनुदान रक्कम रु.४०.०० लक्ष,
• ग्रामीण भागातील मागासवगौय विद्याथ्यर्थ्यांना संगणक प्रशिक्षणासाठी रक्कम रु.३०.०० लक्ष,
• व्यवसाय व तांत्रिक प्रशिक्षण योजनांतर्गत Tally (संगणक) प्रशिक्षणासाठी रक्कम रु.३०,०० लक्ष,
• मुलीचे वसतीगृह सोलापूर मध्ये अभ्यासिका, अॅक्टीवीटी रुम, वॉटर हिटर साठी रक्कम रु.२०.०० लक्ष,
• मागासवर्गीय वसतीगृहांना बंकर बेड पुरविणेसाठी रक्कम रु.४०,०० लक्ष,
• अपंग व्यक्तींना स्वयंचलित सहायभूत साधने व तंत्रज्ञान करीता अर्थसहाय्य देणे या योजनेअंतर्गत ई-रिक्षा / ई-बाईकसाठी रक्कम रु.१३०.०० लक्ष,
• अपंग व्यक्तींना शेळीपालन गट अनुदानासाठी रक्कम रु.३०.०० लक्ष, अपंगाना झेरॉक्स मशीन पुरविणेसाठी रक्कम रु.१०.०० लक्ष,
• ग्रामीण भागातील अतितीव्र दिव्यांग मुलांच्या पालकांना मदत (दिव्यांग नवसंजीवनी योजना) साठी रक्कम रु.१०.०० लक्ष,
• नाविन्यपूर्ण योजनेंतर्गत दिव्यांग शाळांना सोलर हिटरसाठी रक्कम रु.२५.०० लक्ष,
• अपंग स्वयंसहायता समूहांना लघु उद्योगासाठी अनुदान रक्कम रु.१०.०० लक्ष इतकी तरतूद करणेत आलेली आहे.
* महिला व बालकल्याण विभाग :-
महिला व बाल कल्याण विभागासाठी एकूण र.रु.३२९.५८ लक्ष इतकी तरतूद केलेली आहे.
• ग्रामीण भागातील कुपोषित मुलांमुलीसाठी व किशोरवयीन मुलींसाठी गरोदर, स्तनदामाता यांना अतिरिक्त आहार पुरविणे (बाल संजीवनी) या योजनेंतर्गत रक्कम रु.२५.०० लक्ष,
• अंगणवाड्यांना विविध साहित्य/ शैक्षणिक उपयोगी साहित्य पुरविणे यासाठी रक्कम रु.१००.०० लक्ष इतकी भरीव तरतूद करणेत आलेली आहे.
• ग्रामीण भागातील महिलांना विविध साहित्य पुरविणे यासाठी रक्कम रु.५०,०० लक्ष
• अतितीव्र कुपोषित बालक (SAM) मुक्त ग्रामपंचायतींना / अंगणवाडी सेविकांना बक्षीस देणे यासाठी रक्कम रु.१०.०० लक्ष इतकी तरतूद करणेत आलेली आहे.
* पशुसंवर्धन विभाग :-
पशुसंवर्धन विभागासाठी एकूण र.रु.३२०.०५ लक्ष इतकी तरतूद केलेली आहे.
• पशुंच्या दुग्ध वाढीसाठी क्षार व जीवनसत्व औषध पुरवठा करणेसाठी रक्कम रु.४०.०० लक्ष, दुग्धोत्पादन वाढविण्यासाठी वंध्यत्व निवारण कार्यक्रम अंतर्गत रक्कम रु.३५.०० लक्ष,
• पशुंच्या आरोग्यासाठी जंतनाशक औषध पुरवठा करणेसाठी रक्कम रु.४०.०० लक्ष व गोचीडनाशक औषध पुरवठा करणेसाठी रक्कम रु.४०.०० लक्ष, पशुंच्या लसीकरण करणेसाठी व तदनुषंगिक औषध खरेदीसाठी रक्कम रु.३०.०० लक्ष. आर्थिकदृष्टया मागायतक योजनेसाठी रक्कम रु.३०कोरलेली आहे.
* ग्रामपंचायत विभावक केलेली आहे
• ग्रामपंचायतीची मात्वमत्ता संगणकीकृत कराती रक्कम रु.६.०० लकी करणेत आलेली आहे.
* ग्रामीण पाणी पुरवठा विभाग बामोषण पाणी पुरवठा विभागासी मागील वषीच्या मूळ तरतूदीपेक्षा रक्कम रु.५.०० लक्ष इतकी वाढ करुन पाणी पुरषा विभागाचावी एकूण ररु.२९६.०१ लक्ष इतकी तरतूद केलेली आहे.
* लघु पाटबंधारेः लघु पाटबंधारे विभागासाती एकूण ८.रू. २००० लक्ष इतकी तातू केलेली आहे.
*बांधकाम विभाग बांधकाम विभागासाठी र.रू.९००.०० लक्ष इतकी तूर केलेली आहे.
• यामध्ये प्रामुख्याने जिल्हा परिषदेच्या उत्पन्नवाढीसाली व्यापारी गाळे बांधणेकामी रक्कम रु.२७.०० लक्ष, जि.प. विश्श्रामगृह बांधकाम, विस्तारीकरण व दुरुस्तीसाठी रक्कम रु.५२.०० लक्ष.
• पंचायत समिती कार्यालयात अभ्यागतांसाठी सुविधा तसेच शौचालय बांधणेसाठी रक्कम रु.२२.०० लक्ष,
• ग्रामीण व इतर जिल्हा रस्ते बांधकाम व विविध विकास कामासाठी रक्कम रु.२६०.०० लक्ष इतकी तरतूद केलेली आहे.
*अ प्रशासन:-
कर्मचाऱ्यांचे कामकाजात प्रशासकीय गतिमानता आणनेसाती व गुणवत्ता वाढीसाठी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण व कार्यशाळा आयोजित करणेसाठी तरतुद करणेत आलेली आहे. आस्थापना विषयक बाबी सुरळीतपणे करण्यासाठी कर्मचारी सेवाप्रणाली तसेच जि.प.मार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांवर संनियंत्रण ठेवणेकामी Dashboard विकसित करणेसाती तरतूद केलेली आहे.
जिल्हा परिषदेच्या स्व:उत्पन्नाचे अंदाजपत्रक तयार करणेस सर्व खाते प्रमुख, सर्व सदस्य यांनी आपआपल्या विषय समित्यांची मान्यता घेऊन मुख्य लेखा व वित्त अधिकारी यांनी अंतिमीकरणास मोलाचे सहकार्य केलेले आहे. जिल्हा परिषदेचे सर्व खातेप्रमुख व उपस्थित सर्व पत्रकार बंधू या सर्वांचे आभार मानून जिल्हा परिषदेच्या स्वः उत्पन्नातील हे सुधारित व मूळ अंदाजपत्रक मंजूरीसाठी या जिल्हा परिषद सर्वसाधारण सभेपुढे सादर करीत आहे. त्यास एकमताने तरतूदीस मंजूरी देण्यात आली.