महाप्रसादालय हे एक धार्मिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य असून, न्यास वसुंधरेची जपणूक करीत आहे — ऋषिकेश आश्रमाचे, अमेरिका मूळ निवासी स्वामी रतवान भारती
अमोलराजे जन्मेजयराजे भोसले यांच्या हस्ते व नागणसूर मठाचे मठाधीश म.नि.प्र. डॉ. अभिनव बसवलिंग महास्वामीजी यांच्या उपस्थितीत स्वामी रतवान भारती यांचा श्रींची प्रतिमा, कृपावस्त्र, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.

महाप्रसादालय हे एक धार्मिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य असून, न्यास वसुंधरेची जपणूक करीत आहे — ऋषिकेश आश्रमाचे, अमेरिका मूळ निवासी स्वामी रतवान भारती
अक्कलकोट : (प्रतिनिधी)

श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जन्मेजयराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली सुरु असलेले महाप्रसादालय हे एक धार्मिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य असून, न्यास वसुंधरेची जपणूक करीत असल्याचे मनोगत स्वामी राम साधक ग्राम ऋषिकेश आश्रमाचे, अमेरिका मूळ निवासी असलेले स्वामी रतवान भारती उत्तराखंड यांनी व्यक्त केले.

ते श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळात आले असता न्यासाचे कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जन्मेजयराजे भोसले यांच्या हस्ते व नागणसूर मठाचे मठाधीश म.नि.प्र. डॉ. अभिनव बसवलिंग महास्वामीजी यांच्या उपस्थितीत स्वामी रतवान भारती यांचा श्रींची प्रतिमा, कृपावस्त्र, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. या वेळी ते बोलत होते.

या प्रसंगी त्यांच्या समवेत रविंद्र साहू,न्यासाचे लेखा परीक्षक ओंकारेश्वर उटगे, माजी नगरसेवक लक्ष्मिकांत धनशेट्टी, प्रदीप पाटील, अजय पाटील, विश्वनाथ कोनापुरे, राजकुमार पाटील, प्रा.शंकरराव व्हनमाने, समर्थ धनशेट्टी, सुनील दसले, नंदू वाघमोडे, योगेश स्वामी, संजयकुमार गंगदे हे उपस्थित होते.

यावेळी न्यासाचे पुरोहित संजय कुलकर्णी, मनोज निकम,चंद्रकांत सोनटकके,वासू कडबगावकर, कल्याणी, प्रवीण घाडगे, आतिश पवार, निखील पाटील, गोटू माने, शहाजीबापू यादव, बाळासाहेब घाटगे, सतीश महिंद्रकर, दत्ता माने, लक्ष्मण बिराजदार, श्रीनिवास गवंडी, शरद भोसले, प्रसाद हुल्ले, रमेश हेगडे, महांतेश स्वामी, शिव स्वामी, एस.के. स्वामी, धनंजय निंबाळकर, विशाल घाटगे, तानाजी पाटील, अनिल बिराजदार, मल्लिनाथ कोगनुरे, शावरेप्पा माणकोजी, विठ्ठल रेड्डी यांच्या सह सेवेकरी, कर्मचारी, भक्तगण बहुसंख्येने उपस्थित होते.
