स्वामीनाम हेच सर्वश्रेष्ठ धन – जेष्ठ अभिनेत्री आशा काळे
ज्येष्ठ अभिनेत्री आशा काळे यांचा सत्कार करताना महेश इंगळे दिसत आहेत.

स्वामीनाम हेच सर्वश्रेष्ठ धन – जेष्ठ अभिनेत्री आशा काळे

(अ.कोट, श्रीशैल गवंडी, दि. २३/०३/२५) जीवनामध्ये नामस्मरणाला अनन्यसाधारण महत्व आहे. स्वामीनामाची महती मनन व चिंतन केल्याने कळते.
मला या स्वामींच्या नामचिंतनाने ही महती कळाली आहे. यामुळे स्वामीनाम हेच माझ्या जीवनातील सर्वश्रेष्ठ धन असल्याचे मनोगत
जेष्ठ मराठी अभिनेत्री आशा काळे यांनी व्यक्त केले. ते येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरास भेट देऊन श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेतले. यावेळी मंदिर समितीच्या वतीने समितीचे चेअरमन महेश इंगळे यांनी जेष्ठ अभिनेत्री आशा काळे यांचा श्री स्वामी समर्थांचे कृपावस्त्र, प्रसाद, प्रतिमा देऊन यथोचित सन्मान केला. यावेळी अभिनेत्री आशा काळे बोलत होत्या. पुढे बोलताना अभिनेत्री आशा काळे यांनी
श्री स्वामी समर्थ महाराजानी वटवृक्षाखाली साधना केली, तो वटवृक्ष नामस्मरणरूपी सावली आहे. यात आपल्या ऐश्वर्याचा आनंद सामावलेला आहे. हा आनंद आपणाला वटवृक्षाच्या सावलीने व स्वामींच्या दर्शनातून भेटतो. त्यामुळे आता उर्वरित आयुष्यही स्वामींच्या नामस्मरणातच व्यतीत करून जीवन सार्थकी करायचं असल्याचे मनोगतही व्यक्त केले. या प्रसंगी प्रथमेश इंगळे, सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, उज्वलाताई सरदेशमुख, यांच्यासह स्वामीभक्त व देवस्थानचे कर्मचारी, सेवेकरी उपस्थित होते.

फोटो ओळ – ज्येष्ठ अभिनेत्री आशा काळे यांचा सत्कार करताना महेश इंगळे दिसत आहेत.
