Akkalkot : कमलाराजे चौकातील आयलँड कारंजाला पुनर्जीवन; अक्कलकोट शहराच्या सुशोभीकरणात भर

अक्कलकोट (प्रतिनिधी): अक्कलकोट शहरातील कमलाराजे चौकातील आयलँड कारंजा अनेक वर्षांपासून बंद होता. अखेर मुख्याधिकारी रमाकांत डाके यांच्या पुढाकाराने त्याला पुनर्जीवन मिळाले असून, यामुळे नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

शहराच्या सौंदर्यात भर घालणाऱ्या या कारंज्याच्या दुरुस्तीमध्ये हौद लिकेज दुरुस्ती, स्वच्छता, रंगरंगोटी आणि पाइपलाइन दुरुस्ती करण्यात आली. या कार्यात निसर्ग सेवा फाउंडेशन, काशीराया काका पाटील विद्यालयाचे विद्यार्थी आणि नगरपरिषद कर्मचारी यांचे मोठे योगदान राहिले.


मुख्याधिकारी रमाकांत डाके यांनी सांगितले की, बसस्थानकाजवळील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील आयलँडही लवकरच सुरू करण्यात येईल. यामुळे शहराच्या सौंदर्यात वाढ होणार असून नागरिक आणि पर्यटकांना आनंददायी अनुभव मिळणार आहे.

यासाठी आरोग्य निरीक्षक नितीन शेंडगे, पाणीपुरवठा विभागाचे मनोजकुमार ईश्वरकट्टी, बांधकाम विभागाचे भांबरे आणि नगरपरिषद कर्मचाऱ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले.