भाविकांच्या सोईसह वटवृक्ष मंदीराचे उपक्रम कौतुकास्पद – न्यायमुर्ती मनोज शर्मा


(प्रतिनिधी – अक्कलकोट, दि.२५) – येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे स्वामी दर्शनासाठी मंदीरात येणाऱ्या भाविकांकरीता असलेल्या सोई सुविधा या सर्वोत्तम दर्जाच्या असून या सह मंदिर समितीचे सर्व धार्मिक सामाजिक उपक्रम कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन

मनोगत सोलापूरचे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायमुर्ती मनोज शर्मा यांनी व्यक्त केले.

यांनी केले. ते नुकतेच येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरास सहकुटूंब भेट देवून श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेतले. यावेळी मंदीर समितीच्या वतीने समितीचे चेअरमन व नगरसेवक महेश इंगळे यांनी त्यांचा श्रींचे कृपावस्त्र, प्रसाद, प्रतिमा देवून यथोचित सत्कार केला यावेळी मंदीर समितीच्या विवीध कार्याचा आढावा घेतल्यानंतर बोलताना न्यायमुर्ती मनोज शर्मा यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. यावेळी

मंदीर समितीचे सेक्रेटरी आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, त्यांच्या समवेत असलेले अक्कलकोटचे प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी एम.एम. कल्याणकर, सहप्रथम न्याय दंडाधिकारी श्रीमती एन.ए.एल.शेख, न्यायालीन लिपिक स्वप्नील मोरे, पो.ह.अशोक जमादार, श्रीशैल गवंडी, संजय पवार, श्रीकांत मलवे, गिरीश पवार, विपूल जाधव, प्रसाद सोनार आदींसह जिल्हा न्यायालीन कर्मचारी उपस्थित होते.