*जागतिक रंगभूमी दिनानिमित्त रंगले विद्यार्थ्यांचे कविसंमेलन* ( पुणे प्रतिनिधी ) जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वाबळेवाडी येथे जागतिक रंगभूमी दिनानिमित्त विद्यार्थ्यांचे कविसंमेलन आयोजित करण्यात आले होते. यात विद्यार्थ्यांनी झाड, बाहुली, आई, बाबा, शाळा, गुरुजी अशा विविध विषयांवर कविता सादर केल्या. त्यास उपस्थित मुलांनी टाळ्यांची जोरदार दाद दिेली. आंतरराष्ट्रीय स्तरावर नावाजलेली जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वाबळेवाडी येथे जागतिक रंगभूमी दिनानिमित्त विद्यार्थ्यांच्या कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले. या कवी संमेलनाचे सूत्रसंचालन श्रीतेज वाबळे या विद्यार्थ्याने केले. या कार्यक्रमाला उपस्थित विद्यार्थ्यांनी उदंड प्रतिसाद दिला व वेगवेगळ्या विषयावर आपल्या कविता सादर केल्या. या कवी संमेलनासाठी शाळेतील साहित्यिक शिक्षक सचिन बेंडभर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक, शिरूर तालुका प्राथमिक शिक्षक पतसंस्थेचे माजी चेअरमन व शिष्यवृत्ती तज्ञ विजय गोडसे, अरूणा घोडेकर, सुनिल पलांडे, जयश्री पलांडे, किरण अरगडे, गोरक काळे, प्रतिभा पुंडे, दीपक खैरे, तुषार सिनलकर, पोपट दरंदले, विद्या सपकाळ, वैशाली जगताप, गितांजली वाघोले आणि साहित्यिक शिक्षक सचिन बेंडभर उपस्थित होते. तर शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष संदीप वाबळे, उपाध्यक्ष मल्हारी वाबळे, ग्रामपंचायत सदस्य प्रकाशकाका वाबळे, माजी सरपंच केशव वाबळे, यात्रा कमिटीचे अध्यक्ष अंकुश वाबळे, सतिश वाबळे, सुरेखा वाबळे, सतिश कोठावळे, प्रकाश विठ्ठल वाबळे आदी मान्यवर कार्यक्रमाला उपस्थित होते. वाबळेवाडी शाळेच्या या उपक्रमाबद्दल केंद्रप्रमुख प्रकाश लंघे, विस्तार अधिकारी वंदना शिंदे, गटशिक्षणाधिकारी बाळकृष्ण कळमकर यांनी विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे कौतुक केले आहे.
*फोटो :* ओळ : कवी संमेलनाचे सूत्रसंचालन करताना श्रीतेज वाबळे