चपळगांव महालक्ष्मी प्रतिष्ठानच्या वतीने प्रथमेश इंगळे यांचा वाढदिवसानिमीत्त सत्कार
प्रथमेश इंगळे यांच्या वाढदिवसानिमीत्त सत्कार करताना महालक्ष्मी प्रतिष्ठानचे सदस्य दिसत आहेत.

चपळगांव महालक्ष्मी प्रतिष्ठानच्या वतीने प्रथमेश इंगळे यांचा वाढदिवसानिमीत्त सत्कार

(श्रीशैल गवंडी, अ.कोट.)
येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन महेश इंगळे यांचे सुपुत्र प्रथमेश इंगळे यांच्या वाढदिवसानिमित्त चपळगाव महालक्ष्मी प्रतिष्ठानच्या वतीने प्रथमेश इंगळे यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला. हा सत्कार समारंभ सोहळा श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान कार्यालयात संपन्न झाला. यावेळी बोलताना प्रथमेश इंगळे यांनी तालुक्यातील चपळगाव सारख्या छोट्याशा गावातील युवकांनी महालक्ष्मी प्रतिष्ठानची स्थापना करून अनेक समाजाभिमुख उपक्रम राबवून तालुक्यातील युवकांपुढे आदर्श निर्माण केला आहे. अशा समाज उपयोगी प्रतिष्ठानच्या वतीने माझा वाढदिवस साजरा होवून माझा सन्मान होणे माझ्या व्यक्तीगत आयुष्याकरीता अभिमानास्पद बाब आहे. माझ्या वाढदिवसानिमीत्त चप्पळगांवसियांनी व्यक्त केलेल्या प्रेमपूर्वक शुभेच्छांचा वर्षाव स्वीकारून सर्वांचे आपल्यावरील प्रेम असेच कायम राहावे अशी सदिच्छा व्यक्त करून या या सन्मानाप्रित्यर्थ आभार व्यक्त करतो असे मनोगत व्यक्त केले. यावेळी महालक्ष्मी प्रतिष्ठानचे दिनेश म्हमाणे, मनोज इंगुले, स्वप्निल दुलंगे, स्वप्निल बणजगोळे, रत्न कोरे, धर्मेंद्र दुलंगे, लक्ष्मीकांत म्हमाणे, आकाश दुलंगे, गणेश दुलंगे, रमेश शिंदे इत्यादी उपस्थित होते.

फोटो ओळ – प्रथमेश इंगळे यांच्या वाढदिवसानिमीत्त सत्कार करताना महालक्ष्मी प्रतिष्ठानचे सदस्य दिसत आहेत.
