स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळात सोमवारी बुद्ध पौर्णिमेनिमित्त हजारो स्वामी भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. सलग सुट्ट्यानी झालेल्या गर्दीमुळे भक्तांची गैरसोय टाळण्यासाठी न्यासाने महाप्रसादाची वेळ वाढवली होती.*
अक्कलकोट : प्रतिनिधी*
*दिगंबरा दिगंबरा…. श्रीपाद वल्लभ दिगंबरा….! श्रीक्षेत्र अक्कलकोटनिवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय…! श्री अन्नपूर्णा माता की जय..!! च्या जयघोषात श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळात सोमवारी बुद्ध पौर्णिमेनिमित्त अक्कलकोट नरेश श्रीमंत विजयसिंहराजे भोसले यांचे चिंरंजीव जन्मेजयराजे विजयसिंहराजे भोसले संस्थापक अध्यक्ष श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ (ट्रस्ट), अक्कलकोट यांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांचे नातू अमोलराजे जन्मेजयराजे भोसले कार्यकारी अध्यक्ष, अन्नछत्र मंडळ (ट्रस्ट) यांच्या कुशल नेतृत्वाखाली न्यासाकडून महाप्रसादाची उत्कृष्ठ व्यवस्थेने भक्तांनी समाधान व्यक्त केले. लाखो स्वामी भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. सलग सुट्ट्यानी झालेल्या गर्दीमुळे भक्तांची गैरसोय टाळण्यासाठी न्यासाने महाप्रसादाची वेळ वाढवली होती.*
दरम्यान न्यासाच्या महाप्रसाद गृहात मुख्य पुरोहित अप्पू पुजारी यांच्या हस्ते विधिवत पूजा, धार्मिक कार्यक्रम भक्तांच्या उपस्थितीत संपन्न झाले. श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात स्वामी भक्तांच्या उपस्थितीत श्रींना नैवेद्य दाखविण्यात आले.
स्वामी भक्तांनी अन्नछत्र मंडळाच्या परिसरात असलेल्या श्री शमी-विघ्नेह गणेश मंदिर, ब्रह्मांडनायक उभी स्वामींची मूर्ती, नियोजित महाप्रसादगृह इमारत, सध्याचे अद्यावत तात्पुरते महाप्रसादालय, कपिला गाय, कारंजा, शिवस्मारक, कार्यरत यात्री निवास-१, यात्रीभुवन-२, अतिथी गृह, आऊटडोअर व इनडोअर जीम, प्रशस्त वाहनतळ, टेकडीवरील श्री समर्थ वाटिका, शिवचरित्र प्रदर्शन हॉल, अग्निशमन, रुग्णवाहिका, आश्रयदाते कक्ष हे सर्व न्यासाचे विविध उपक्रम भक्तांच्या सेवेर्थ सुरु केलेल्या विविध उपक्रम व व्यवस्थेचे स्वागत करुन न्यासाचे कौतुक केले.
चौकट :
*महाप्रसादाचे उत्कृष्ठ नियोजन :*
अक्कलकोट नरेश श्रीमंत विजयसिंहराजे भोसले यांचे चिंरंजीव जन्मेजयराजे विजयसिंहराजे भोसले संस्थापक अध्यक्ष श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ (ट्रस्ट), अक्कलकोट यांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांचे नातू अमोलराजे जन्मेजयराजे भोसले कार्यकारी अध्यक्ष, अन्नछत्र मंडळ (ट्रस्ट) यांच्या कुशल नेतृत्वाखाली न्यासाकडून महाप्रसादाचे उत्कृष्ठ नियोजन व व्यवस्थापन पाहून माझ्यासह स्वामी भक्तांनी समाधान व्यक्त केले.
सुशांत निकम
स्वामी भक्त वेंगुर्ले (कोकण)
यावेळी न्यासाचे उपाध्यक्ष अभय खोबरे, सचिव शामराव मोरे, विश्वस्त भाऊ कापसे, सौरभ मोरे, मनोज निकम, सनी सोनटक्के, निखील पाटील, अतिश पवार, गोटू माने, योगेश कटारे, सतीश महिंद्रकर, शहाजी यादव, संजय गोंडाळ, बाळासाहेब घाडगे, बाळासाहेब पोळ, नामा भोसले, पिंटू हळ्ळुरे, संभाजीराव पवार, श्रीनिवास गवंडी, दत्ता माने, तानाजी पाटील, राजू पवार, रमेश हेगडे, प्रसाद हुल्ले, शरद भोसले, बसवराज क्यार, अनिल बिराजदार, चंद्रकांत हिबारे, एस के स्वामी, सिद्धाराम कल्याणी, शावरेप्पा माणकोजी, मल्लिनाथ कोगनुरे, कल्याण देशमुख, गोविंदराव शिंदे, विशाल घाडगे, रोहित कदम, विठ्ठल रेड्डी, समर्थ चव्हाण यांच्यासह सेवेकरी, कर्मचारी, भक्तगण बहुसंख्येने उपस्थित होते.
Back to top button
×
No WhatsApp Number Found!