गावगाथा

संघर्षावर मात करत राजू जाधव यांची शिक्षकपदी निवड

जेऊर ग्रामस्थांच्या वतीने सत्कार; प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण पूर्ण करून मिळविले यश

संघर्षावर मात करत राजू जाधव यांची शिक्षकपदी निवड

जेऊर ग्रामस्थांच्या वतीने सत्कार; प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण पूर्ण करून मिळविले यश

जेऊर (प्रतिनिधी) : जेऊर गावातील गरीब व कष्टकरी कुटुंबातील सुपुत्र राजू (पापण्या) जाधव यांची जत येथे शिक्षक म्हणून निवड झाल्याबद्दल जेऊर ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी मुकेश कांबळे, शिवलिंग वग्गे, स्वामी सुभाष हंद्राळ, राजू कोळी, राजू बजंत्री, मलू उकळे आदी मान्यवर उपस्थित होते.

HTML img Tag Simply Easy Learning    

अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून शिक्षण घेत राजू जाधव यांनी मिळविलेले यश कौतुकास्पद आहे. वयाच्या अवघ्या बाराव्या वर्षापासून त्यांनी कष्टाची वाट धरली. रात्रंदिवस हॉटेलमध्ये काम करून मिळणाऱ्या उत्पन्नातून शिक्षणाचा खर्च भागवत त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले.

HTML img Tag Simply Easy Learning    

सुरुवातीच्या काळात दिवसाला केवळ दहा रुपये मिळवून चार तास काम करणे आणि त्यानंतर शाळेत जाऊन शिक्षण घेणे, असा त्यांचा दिनक्रम होता. परिस्थिती कितीही प्रतिकूल असली तरी शिक्षणाची जिद्द आणि मोठे होण्याचे स्वप्न त्यांनी कधीही सोडले नाही. त्यांच्या या संघर्षातून आजच्या युवकांसह विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळते.

HTML img Tag Simply Easy Learning    

राजू जाधव यांच्या यशाच्या प्रवासात गावातील शिक्षक, ग्रामस्थ, मित्रपरिवार तसेच अनेक सहकाऱ्यांचे मोलाचे योगदान लाभले. शिक्षण पूर्ण करण्यासाठी ज्यांनी मदत व मार्गदर्शन केले, त्यांची जाणीव त्यांनी कायम जपली. या सर्वांच्या सहकार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करत त्यांनी शिक्षकपदापर्यंत मजल मारली.

HTML img Tag Simply Easy Learning    

कष्टाला जिद्दीची साथ मिळाली तर परिस्थिती कितीही कठीण असली तरी यश मिळविता येते, याचे जिवंत उदाहरण राजू जाधव यांनी आपल्या कर्तृत्वातून दाखवून दिले आहे. त्यांच्या या यशाबद्दल जेऊर ग्रामस्थांकडून अभिनंदन करण्यात आले.

HTML img Tag Simply Easy Learning    

शिक्षक म्हणून नव्या जबाबदारीची सुरुवात करणाऱ्या राजू जाधव यांच्या हातून अनेक विद्यार्थ्यांचे भविष्य घडावे आणि त्यांच्या ज्ञानाने विद्यार्थ्यांचे जीवन उजळून निघावे, अशा शुभेच्छा यावेळी ग्रामस्थांनी दिल्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button