कै.रूपालीताई इंगळे यांच्या स्मृती प्रित्यर्थ चुंगीतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप
विद्यार्थ्यांना वह्या व पेनचे वाटप करताना राजू माने, प्रथमेश इंगळे, शाळेचे मुख्याध्यापक के.एस.गायकवाड व अन्य मान्यवर दिसत आहेत.

कै.रूपालीताई इंगळे यांच्या स्मृती प्रित्यर्थ चुंगीतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप……

(अक्कलकोट,श्रीशैल गवंडी) दि.२९/८/२४ येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा माजी नगराध्यक्ष नगरसेवक महेश इंगळे यांच्या सुविद्य पत्नी कै.सौ.रूपालीताई इंगळे यांच्या स्मृती प्रित्यर्थ नुकतेच प्रथमेश इंगळे व फत्तेसिंह शिक्षण संस्थेचे अध्यक्ष राजू माने यांच्या मुख्य उपस्थितीत तालुक्यातील चुंगी येथील विद्यार्थ्यांना शालेय साहित्यांचे (वह्या, पेनचे) वाटप करण्यात आले. चुंगीतील फत्तेसिंह शिक्षण संस्था संचलित श्रीमती धोंडूबाई स्वामी प्रशालेतील सर्व विद्यार्थ्यांना बाळासाहेब एकबोटे मित्र परिवाराच्या वतीने ६०० वह्या व पेनचे वाटप करून हा उपक्रम राबविण्यात आला. याप्रसंगी बोलताना संस्थेचे चेअरमन राजू माने यांनी महेश इंगळे व इंगळे कुटुंबीय परिवार हे पूर्वीपासूनच सामाजिक उपक्रमात नेहमीच भाग घेत असतात. समाजाच्या तळागाळातील नागरिक, विद्यार्थी, अबालवृद्धांना सहकार्य करून नेहमीच मदतीचा हात देत असतात. या माध्यमातून समाजातील नागरिकांच्या जीवनाशी त्यांची आपुलकीची बांधिलकी असलेली जाणीव होत असते असे मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी बाळासाहेब एकबोटे मित्र परिवारातील सदस्य प्रा.शिवशरण अचलेर यांनी बोलताना ‘विद्या विनयेन शोभते’ या संस्कृत उक्तीप्रमाणे विनयशीलता, नम्रपणा हे गुण महेश इंगळे यांच्या व्यक्तिमत्त्वात ठासून भरलेले आहेत. त्यांच्या सुविद्य पत्नी व आमच्या ताई कै.रुपालीताई यांना देखील मी अगदी लहानपणापासून ओळखत असून ते माझ्या नेहमीच संपर्कात होत्या. त्यांचाही नम्र स्वभाव हा प्रत्येकाला आदरयुक्त व आधार युक्त वाटायचा. नम्रताच विद्यार्थ्यांना शिक्षणात यश संपादन करण्यास प्रेरित करीत असते म्हणून आमच्या सर्वांचे श्रद्धास्थान महेश इंगळे व कै.रूपालीताई इंगळे यांच्या नम्रपणाची व या नम्रपणामुळे जीवनाकडे सकारात्मक दृष्टीने बघण्याची प्रेरणा घेऊन विद्यार्थ्यांनी शिक्षण घ्यावे व या कामी त्यांची स्मृती नेहमीच विद्यार्थ्यांच्या दृष्टीक्षेपात राहावी याकरिता विद्यार्थ्यांना कै. रूपालीताईंची प्रतिमा असलेले ६०० वह्यांचे आज येथे वाटप करण्यात आले असल्याचे मनोगत व्यक्त केले. या कामात आमचे परममित्र व स्विमिंग ग्रुपचे सदस्य बाळासाहेब एकबोटे यांचे मोलाचे योगदान असल्याचेही मनोगत व्यक्त केले. यावेळी तानाजीराव चव्हाण, अमर शिंदे, संस्थेचे उपाध्यक्ष संतोष जाधव, सुधाकर गोंडाळ, आनंदराव माने, प्रा.शिवशरण अचलेर, रामचंद्र समाणे, अंकुश केत, श्रीकांत झिपरे, सुनील पवार, बाळासाहेब एकबोटे, चंद्रकांत सोनटक्के, प्रशालेचे मुख्याध्यापक
के.एस.गायकवाड व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व चुंगीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

फोटो ओळ – विद्यार्थ्यांना वह्या व पेनचे वाटप करताना राजू माने, प्रथमेश इंगळे, शाळेचे मुख्याध्यापक के.एस.गायकवाड व अन्य मान्यवर दिसत आहेत.
