गावगाथाठळक बातम्या

भारतीय उद्योगाचा महामेरू हरपला ; टाटा समुहाचे माजी अध्यक्ष रतन टाटा यांचं निधन ; जगभरात हळहळ

मुंबई (प्रतिनिधी): भारतीय उद्योग क्षेत्रातील सर्वात ज्येष्ठ आणि ऋषीतुल्य व्यक्तिमत्व टाटा उद्योग समूहाचे मानद अध्यक्ष रतन नवल टाटा (वय ८६) यांचे आज रात्री मुंबईतील ब्रिच कँडी रुग्णालयात वृद्धापकाळाने निधन झाले.

त्यांच्या निधनाने संपूर्ण उद्योग क्षेत्रात हळहळ व्यक्त होत आहे. टाटा सन्स चे अध्यक्ष एन. चंद्रसेकरन यांनी यासंदर्भात एक पत्रक प्रसिद्धीला देऊन ही माहिती दिली आहे.

 

रतन टाटा गेले काही दिवस आजारी होते. काही दिवसांपूर्वी देखील त्यांना गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र आपण नियमित तपासण्या आणि चाचण्यांसाठी रुग्णालयात दाखल झाल्याचे स्पष्टीकरणही त्यांच्यातर्फे देण्यात आले होते. त्यामुळे त्यांची तब्येत व्यवस्थित असल्याचे मानले जात होते. मात्र ते समाधान अल्पजीवीच ठरले. आज पुन्हा त्यांना अत्यवस्थ अवस्थेत रुग्णालयात नेण्यात आले. त्यांची तब्येत सुधारावी म्हणून डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न केले, मात्र ते अयशस्वी ठरले आणि रात्री त्यांची प्राणज्योत मालवली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button