अक्कलकोट : (प्रतिनिधी) तीर्थक्षेत्र अक्कलकोट येथील ग्रामदैवत श्री मल्लिकार्जुन यात्रा महोत्सवानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमासह चौथ्या दिवशीही मानाच्या काट्यांच्या भव्य मिरवणूक काढण्यात आले होते.
काट्यांच्या मिरवणूक मार्गावर विविध संघटना व समाजाकडून पेंडखजूर, सुगंधी दूध, लाडू, वाटप करण्यात आले. ग्रामदैवत मल्लिकार्जुन यात्रेतील मानांच्या काट्यांच्या मानकरी रत्नाकर पाटील, दयानंद रोडगे, शशिकांत लिंबूतोटे, संजयकुमार आडवीतोटे, मल्लिनाथ नंदीकोले यांनी आपापल्या काठ्यांना महाकाल हर हर महादेव ब्रम्हांडनायक महांकाल असे विविध सजावटी करून गावातील प्रमुख मार्गावरून सवाद्य मिरवणूक काढण्यात आले होते या मार्गावर योगा ग्रुपच्या वतीने उपस्थित शिवभक्तांना पेंडखोजरीचा वाटप करण्यात आले. या ग्रुपचे अध्यक्ष राजकुमार उमराणीकर कल्याणी पाटील अशोक कलशेट्टी विश्वनाथ देवरमणी राजकुमार गोबर विश्वनाथ करकी श्रीकांत झिपरे गोपीनाथ पाटील, प्रदीप हिंडोळे सुनील गोरे शिवाप्पा रामपुरे नागेश ताडमारे प्रकाश कोळी वासुदेव देसाई संतोष माडेकर शशिकांत बिदरकोटी अशोक चव्हाण, प्रितिष किलजे यांच्यासह आदी उपस्थित होते.
याप्रसंगी उत्सव शांततेत काढण्यासाठी देवस्थानचे अध्यक्ष शिवलिंगया स्वामी विश्वस्त बसवराज माशाळे महेश हिंडोळे स्वामीनाथ हिप्परगी राजकुमार नागोरे मल्लिनाथ माळी यांनी परिश्रम घेतले.