महात्मा ज्योतीबा फुले असामान्य व्यक्तिमत्व –रेखा सोनकवडे
जि .प .प्राथमिक मराठी शाळेत क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती साजरी करण्यात आली .कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रत्नाबाई रेऊरे होत्या तर फोटोपूजन मनिषा कुणाळे यांनी केले .जोतीराव गोविंदराव फुले हे महात्मा फुले नावाने लोकप्रिय झाले .महाराष्ट्रातील एक सामाजिक कार्यकर्ते विचारवंत जातीविरोधी समाजसुधारक आणि लेखक होते . समाजिक प्रबोधन अस्पृश्यता जातीव्यवस्थेचे निर्मूलन स्त्रियाना व मागासजातीच्या लोकांना शिक्षण देण्याचे महान कार्य त्यांनी केले .ज्या काळात स्त्रियांना फक्त चूल आणि मूल या चौकटीत बसवलं होत बालविवाह सती जाणे केशवपन करणे या प्रथा महात्मा ज्योतिबा फुले यांना मोडीत काढायच्या होत्या .क्रांति करणे सोपे नव्हते पण समाजातील या रुढी परम्परा अन्याय दूर करायचा होता त्यासाठी खूप मोठी क्रांति केली .सावित्रीबाई फुले यांना शिक्षण दिल आणि पुणे येथे पहिली मुलींची शाळा काढली .त्यासाठी समाजाचा विरोध पत्करला .शेण चिखल अंगावर घेतलं पण माघार घेतली नाही .क्रांति करण्याच बळ सावित्रीबाई फुले आणि ज्योतिबा फुले यांनी एकमेकांना दिल म्हणूनच ते क्रांतिसूर्य आणि क्रांतिज्योती बनले . त्यांनी शिक्षणाची गंगा सुरू केली म्हणूनच आज स्त्री प्रत्येक क्षेत्रात आपला ठसा उमटवत आहे .कर्तुत्ववाच आणि जगण्याचे धाडस तिच्यात आहे असे मुख्याध्यापिका रेखा सोनकवडे यांनी माहिती सांगताना म्हणाल्या .महात्मा ज्योतिबा फुले यांनी .समान हक्क मिळवुन देण्यासाठी सत्यशोधक समाजाची स्थापना केली . शेतकऱ्याचे आसूड त्यांचा प्रसिद्ध ग्रंथ होता .समाजासाठी खूप मोलाचे कार्य ज्योतिबा फुले यांनी केलेले आहे .क्रांतिसूर्य ज्योतिबा फुले यांचे कार्य असामान्य व जगाला प्रेरणादायी आहे .क्रांति साधारण व्यक्ती करू शकत नाही त्यासाठी असामान्य व्यक्तिमत्वच लागत ते महात्मा ज्योतिबा फुले यांच्याकडे होते म्हणून त्यांनी जगाला नवी दिशा दिली आदर्श दिला .महात्मा ज्योतिबा फुले यांचे कार्य नेहमीच तेजोमय राहणार असे बोलताना रेखा सोनकवडे म्हणाल्या .याप्रसंगी विद्यार्थ्यानी माहिती सांगितली .मनिषा कुणाळे यांनी पण विद्यार्थ्याना मार्गदर्शन केले .