“*श्रीक्षेत्र तीर्थ येथे रामलिंगेश्वर यात्रेचे आयोजन “* श्रीक्षेत्र तीर्थ (ता. द. सोलापूर )श्री प्रभू रामचंद्राच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या तीर्थ येथील श्री रामलिंगेश्वर यात्रा सोमवार दिनांक 14 एप्रिल 2025 पासून प्रारंभ होत आहे. सोमवारी पहाटे पासून आपापल्या घरापासून भाविकांचे नवस फेडण्यासाठी श्री रामलिंगेश्वर मंदिरापर्यंत दंडवत घालण्याचा कार्यक्रम, सकाळी सात वाजता श्रीची पालखी मिरवणूक, नंदिध्वज मिरवणूक, आणि गूळ खोबरे प्रसाद वाटप उपक्रम सायंकाळी पाच वाजता श्री राजेंद्र माणिक जाधव यांनी संपूर्ण महाप्रसाद सेवा श्री चरणी समर्पित केली आहे. रात्री 10 वाजता पौराणिक कन्नड बैलाट होणार आहे.श्री तुळजाराम राजाराम वाघमोडे, मंद्रूप ता. द. सोलापूर यांनी महाप्रसाद सेवेसाठी 75000 रुपये देणगी श्री रामलिंगेश्वर पंच कमिटीस अर्पण केली आहे. मंगळवार दिनांक 15 एप्रिल 2025 रोजी श्री रामलिंगेश्वर मूर्तीस रुद्राभिषेक व तैलाभिषेक, संपूर्ण गावात नंदिध्वज मिरवणूक, सकाळी 11 वाजल्यापासून कन्नड मधून कलगी तुऱ्याची गाणी, सायंकाळी 5 वाजता सोलापूर येथील भाविक श्री सिद्धाराम नागनाथ राचोटी यांनी श्री चरणी महाप्रसाद सेवा समर्पित केली आहे. रात्री 10 वाजता कन्नड नाटक होणार आहे. बुधवार दिनांक 16 एप्रिल रोजी पहाटे श्रीच्या मूर्तीस रुद्राभिषेक व तैलाभिषेक, दिवसभर कलगी तुऱ्याची गाणी, चार वाजता कै. धानप्पा फताटे स्मृती ढाल कुस्ती व श्री रामलिंगेश्वर पंच कमिटीच्या वतीने जंगी मल्लांच्या कुस्त्या, सायंकाळी सहा वाजता एडव्होकेट विक्रांत फताटे यांनी महाप्रसाद सेवा श्री चरणी समर्पित केली आहे. सायंकाळी आठ वाजता श्रीची पालखी मिरवणूक, शोभेचे दारूकाम, नंदिध्वज मिरवणूक भजन गायन, होणार आहे. रात्री 10 वाजता कन्नड नाटकाचे आयोजन करण्यात आले आहे. देवस्थान पंच कमिटी सदस्य विश्वनाथ पावले, प्रभुलिंग शेळगे, अहमद मुल्ला, करबसप्पा पाटील, सिद्धाराम उदंडे, डॉ. सुभाष गुरव यांनी ग्रामस्थांच्या सहकार्याने उत्तम नियोजन केले आहे. यात्रेतील विविध उपक्रमाचा महाप्रसादचा, श्री दर्शनाचा लाभ घेऊन पुनीत व्हावे असे भक्तिपूर्वक आवाहन यात्रा समिती समन्वयक प्रा. डॉ. भीमाशंकर बिराजदार यांनी केले आहे.