गावगाथा

भुरिकवठे येथील ज्ञानदान सार्वजनिक मोफत वाचनालयात प्रजासत्ताक दिन उत्साहाने साजरा

दिन विशेष

भुरिकवठे येथील ज्ञानदान सार्वजनिक मोफत वाचनालयात प्रजासत्ताक दिन उत्साहाने साजरा

HTML img Tag Simply Easy Learning    

भुरीकवठे तालुका अक्कलकोट येथील ज्ञानदान सार्वजनिक मोफत वाचनालया समोर जि प प्राथमीक मराठी शाळेचे मुख्याध्यापक अंकुश तसेच एस.एस.आष्टे प्रशालेचे मुख्याध्यापक कुलकर्णी यांच्या हस्ते महात्मा गांधी व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून ध्वजारोहण करण्यात आले.
यावेळी प्रा चंद्रकांत पोतदार यांनी आपले मनोगत व्यक्त करताना विद्यार्थ्यांना उद्देशून आपल्या सार्वजनिक ग्रंथालयातील बाल वाङ्मयाचा तसेच कथा कादंबरी नाटक थोर नेत्यांचे चरित्र स्पर्धा परीक्षांची पुस्तके मासिके पाक्षिके यांचा लाभ घ्यावा असे आवाहन केले यावेळी वाचन संकल्प महाराष्ट्राचा या कार्यक्रमात भाग घेऊन प्रथम द्वितीय व तृतीय क्रमांक व उत्तेजनार्थ म्हणून दोघांना जि प मराठी शाळेच्या विद्यार्थी विद्यार्थिनींना वही व पेन बक्षीस म्हणून वाटप करण्यात आले खाऊ वाटपानंतर कार्यक्रमाची सांगता झाली यावेळी संस्थेचे अध्यक्ष आप्पासाहेब कलशेट्टी खजिनदार शिवाप्पा कुंटोजी संस्थेचे सर्व कर्मचारी व बहुसंख्या ग्रामस्थ महिला भगिनी उपस्थित होते शेवटी सहाय्यक ग्रंथपाल संजय सोलापूरे यांनी उपस्थितांचे आभार मानले

HTML img Tag Simply Easy Learning    

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button