गावगाथा

डिजिटल च्या काळात विद्यार्थ्यांमध्ये स्मरणशक्ती, एकाग्रता आणि आत्मविश्वास वाढविण्यासाठी विशेष कार्यशाळा…. डॉ. जितेंद्र बोरा यांचे युवक व पालकांसाठी खास व्याख्यान…

येथील कनिष्ठ महाविद्यालयात आयोजित व्याख्यानाप्रसंगी डॉ. जितेंद्र बोरा चित्रफितीद्वारे मार्गदर्शन करताना...

डिजिटल च्या काळात विद्यार्थ्यांमध्ये स्मरणशक्ती, एकाग्रता आणि आत्मविश्वास वाढविण्यासाठी विशेष कार्यशाळा…. डॉ. जितेंद्र बोरा यांचे युवक व पालकांसाठी खास व्याख्यान…

(मुरूम प्रतिनिधी ता.4) :

काळानुरूप विद्यार्थ्यांमध्ये मानसिक-बौद्धिक एकाग्रता, आत्मभान, आंतरिक ऊर्जा व ज्ञानसंपन्न बनायचे असेल तर या तंत्रज्ञानाच्या युगात मुलांच्या मेंदूची कार्यप्रणाली व विकास होणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन बीड येथील स्मार्ट ब्रेन टेक्नो सर्विसेस फाउंडरचे रो. डॉ. जितेंद्र बोरा यांनी केले. रोटरी क्लब मुरूम सिटी व कनिष्ठ महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने पालक आणि विद्यार्थ्यांसाठी आयोजित शुक्रवारी (ता. ३) रोजी विशेष कार्यशाळेत ते व्याख्याते म्हणून बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य गोविंद इंगोले होते. यावेळी रोटरीचे अध्यक्ष प्रा. डॉ. आप्पासाहेब सूर्यवंशी, सचिव कल्लप्पा पाटील, मुख्याध्यापक हरी शंके आदींची उपस्थिती होती. पुढे बोलताना डॉ. जितेंद्र बोरा म्हणाले की, पेरेंटिंग व ब्रेन डेव्हलपमेंट या विषयावर मुलांच्या मेंदूची कार्यप्रणाली व विकास, जन्मजात गुण ओळखण्याचे तंत्र कौशल्य, ब्रेन मॅपिंग टेस्ट (मेंदूची चाचणी), स्मरणशक्ती, एकाग्रता आणि आत्मविश्वास वाढविण्याचे उपाय, सोशल मीडिया ऍडिक्शन व आळस यावर उपायोजना विस्ताराने चित्रफितीद्वारे मांडल्या. या कार्यक्रमासाठी प्रा. डॉ. महेश मोटे, गोविंद पाटील, शिवशरण वरनाळे, डॉ. नितीन डागा, डॉ. महेश स्वामी, डॉ. प्रिती चिलोबा, संध्या वाकडे, कमलाकर मोटे, सुनिल राठोड, मल्लिकार्जुन बदोले, बाबासाहेब पाटील, प्रकाश रोडगे, राजेंद्र वाकडे, प्रा. विनय इंगळे, गजानन उपासे, किशोर कांबळे, रोहन हराळकर, प्रकाश चव्हाण, इंगोले बालाजी, प्रसाद इंगोले आदींनी पुढाकार घेतला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. आप्पासाहेब सूर्यवंशी यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. शेषराव राठोड तर आभार कल्लप्पा पाटील यांनी मानले. या कार्यक्रमासाठी जिल्हा परिषद कन्या प्रशालेतील दहावीच्या मुली, कनिष्ठ महाविद्यालयातील अकरावी-बारावीचे विद्यार्थी व पालकांचा उस्फुर्त सहभाग राहिला. फोटो ओळ : मुरूम, ता. उमरगा येथील कनिष्ठ महाविद्यालयात आयोजित व्याख्यानाप्रसंगी डॉ. जितेंद्र बोरा चित्रफितीद्वारे मार्गदर्शन करताना…

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button