शरण पाटील मित्रमंडळाकडून गरीब विद्यार्थ्यांना शालेय स्कूल बॅगचे वाटप
शालेय विद्यार्थ्यांना वाटप

शरण पाटील मित्रमंडळाकडून गरीब विद्यार्थ्यांना शालेय स्कूल बॅगचे वाटप

मुरूम, ता. उमरगा, ता. २४ (प्रतिनिधी) : प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही सामाजिक क्षेत्रात सातत्य ठेवून मुरूम शहरातील शरण पाटील मित्रमंडळाच्या पुढाकाराने बुधवारी (ता. २४) रोजी शालेय स्कूल बॅगचे वाटप प्रतिभा निकेतन विद्यालयात उमरगा जनता बँकेचे चेअरमन शरण पाटील यांच्या हस्ते गरीब होतकरू विद्यार्थ्यांना करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापिका महानंदा रोडगे होत्या. यावेळी माजी उपनगराध्यक्ष श्रीकांत बेंडकाळे, सुजित शेळके, गौस शेख, राजू मुल्ला, उपमुख्याध्यापक उल्हास घुरघुरे, संतोषकुमार सुर्यवंशी, परिवेक्षक विवेकानंद पडसाळगे, प्रशांत मुरूमकर आदिंची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता शरण पाटील मित्रमंडळाचे आयोजक देवराज संगुळगे, शिवा दुर्गे, राजकुमार लामजने, मेघराज लादे, नदीम इनामदार, संतोष स्वामी, सलमान कागदी, किशोर व्हडले, सूरज राजपूत आदींनी पुढाकार घेतला. फोटो ओळ : मुरूम, ता. उमरगा येथील शरण पाटील मित्र मंडळाकडून शरण पाटील यांच्या हस्ते शालेय बॅगचे वाटप करताना महानंदा रोडगे, देवराज संगुळगे, शिवा दुर्गे, राजकुमार लामजने, उल्हास घुरघुरे व अन्य.
