शिक्षक नेते शिवाजी शेंडगे यांचे प्रयत्नाने उत्तर भारतीय शिक्षकांसाठी विशेष ट्रेनचे दादरहून प्रस्थान
विशेष

शिक्षक नेते शिवाजी शेंडगे यांचे प्रयत्नाने उत्तर भारतीय शिक्षकांसाठी विशेष ट्रेनचे दादरहून प्रस्थान

मुंबई प्रतिनिधी
गणेश हिरवे

काल मुंबई दादर येथून उत्तर भारतीय शिक्षक बंधू भगिनींसाठी शिक्षक नेते शिवाजी शेंडगे यांच्या प्रयत्नाने विशेष ट्रेन दादरहून सोडण्यात आली.याआधी शिक्षकांना सुट्टी मध्ये त्यांचे सामान आणि कुटुंबीय यांचेसह कुर्ला एल टी टी किंवा सी एस एम टी येथून ट्रेन पकडावी लागत होती, पण शेंडगे सरांच्या मध्यस्तीने काल शिक्षकांचा त्रास वाचवा या हेतूने मध्यभागी असलेल्या दादर येथून ट्रेन निघाली. ट्रेनमध्ये जे शिक्षक बंधू भगिनी आपापल्या गावाकडे सुट्टीमध्ये जात होते त्यांच्यासाठी शेंडगे मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने सर्व शिक्षक बंधू भगिनींना त्यांचा प्रवास सुखकर होण्यासाठी मोफत पाण्याची बॉटल आणि बिस्किट पुड्यांचे वाटप करण्यात येऊन त्यांना प्रवासासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. त्यांच्या या उपक्रमास उत्तर भारतीय शिक्षक बंधू भगिनींनी चांगला प्रतिसाद दिला. मुंबईमधील सर्व उत्तर भारतीय शिक्षक हे शेंडगे सरांच्या पाठीशी आहोत असा विश्वास उपस्थित शिक्षकांनी व्यक्त केला.यावेळी उपक्रमामध्ये ज्येष्ठ शिक्षक एन एन सिंग, अजय सिंग, सच्चिदानंद पांडे, करण सिंग पाठक, प्रशांत सिंग, दत्तात्रय थोरवे, प्रवीण कुमार सोनवणे, चंद्रशेखर साळवे, मच्छिंद्र परचंडे, राजेंद्र पाटील, संदीप आव्हाड, आदी मान्यवर प्लॅटफॉर्म वर जातीने हजर होते.शिक्षक निवडणुकीत शेंडगे सरांना आम्ही विजयी करणारच हा विश्वास यावेळी उपस्थितांनी व्यक्त केला.
