सी बी खेडगी महाविद्यालयात माजी विद्यार्थी संघटना आयोजित वार्षिक ” माजी विद्यार्थी सुसंवाद स्नेह मेळावा “संपन्न
माजी विद्यार्थी स्नेह मेळावा

सी बी खेडगी महाविद्यालयात माजी विद्यार्थी संघटना आयोजित वार्षिक ” माजी विद्यार्थी सुसंवाद स्नेह मेळावा “संपन्न

अक्कलकोट –या समारंभाचे अध्यक्ष व संस्थेचे चेअरमन सन्माननीय श्री बसलिंगप्पा खेडगी साहेब यांच्या नेतृत्व व मार्गदर्शनाखाली महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस सी आडवितोट यांच्या विशेष सहकार्याने आयोजित करण्यात आला होता. मेळाव्याच्या प्रारंभी प्रतिमा पूजन व वृक्षास जलअर्पण करून मेळाव्याची सुरुवात करण्यात आली. या मेळाव्याचे प्रास्ताविक अर्थशास्त्र विभाग प्रमुख डॉ. गणपतराव कलशेट्टी यांनी केले. त्यानी आपल्या प्रास्ताविकामध्ये महाविद्यालयाच्या स्थापनेपासून आजतागायत महाविद्यालयाने विविध क्षेत्रात केलेली चौफेर अविस्मरणीय उल्लेखनीय संख्यात्मक आणि गुणात्मक प्रगती बाबत विचार व्यक्त केले. याप्रसंगी उपस्थित सर्व मान्यवर माजी विद्यार्थी बंधू-भगिनींचा माननीय चेअरमन साहेब श्री. बसलिंगप्पा खेडगी साहेब यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या मेळाव्यातून मान्यवर माजी विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले व तसेच महाविद्यालयातील त्यांच्या काही विशेष आठवणी तसेच महाविद्यालयात झालेल्या स्पर्धात्मक प्रगती बाबत समाधान व्यक्त केले. या प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य मार्गदर्शक डॉ. एस सी आडवीतोट यांनी आपले विचार व्यक्त करताना नवीन शैक्षणिक धोरण 2020 व NAAC मूल्यांकनात झालेला अपेक्षित बदल या बाबत परिपूर्ण अचूक मार्गदर्शन केले. तसेच प्रत्येक माजी विद्यार्थी बांधवांनी महाविद्यालयाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी सतत प्रयत्न करणे अत्यंत आवश्यक आहे. असे मत व्यक्त केले. याप्रसंगी माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष प्रा. शरणप्पा अचलेर यांनी देखील आपले विचार व्यक्त केले. आपण सर्वांनी सामूहिक रित्या सकारात्मकपणे संघटित होऊन महाविद्यालयाची शान व सन्मान उंचावण्यासाठी प्रयत्नशील राहण्याचे अभिवचन दिले. मेळाव्याचे अध्यक्ष संस्थेचे चेअरमन सन्माननीय श्री बसलिंगप्पा खेडगी साहेब यांनी आपल्या मनोगत मध्ये महाविद्यालयातील काही महत्त्वपूर्ण भौतिक संशोधनात्मक तंत्रज्ञानात्मक गुणात्मक संख्यात्मक प्रगतीवर लक्ष केंद्रित केले. तसेच महाविद्यालयात शिकत असलेले विद्यार्थी व विद्यार्थिनी आणि प्राध्यापक वर्ग, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वर्ग, माजी विद्यार्थी बंधू-भगिनींना स्पर्धात्मक व गुणात्मक अध्यापन व अध्ययनासाठी सदैव प्रयत्न करण्यास प्रोत्साहित केले. तसेच त्यांनी आपल्या मनोगतामध्ये सध्याचा वर्तमानकाळ हा स्पर्धात्मक काळ असल्याने ” गुणवत्ता वाढवाल तरच टिकाल ! असे महत्त्वपूर्ण गरजेची भूमिका विशद केली. सदर मेळाव्यातून पर्यवेक्षक प्रा. संजय कलशेट्टी कन्नड विभाग प्रमुख डॉ. गुरुलिंगप्पा धबाले व इंग्रजी विभाग प्रमुख प्रा. एस एम परांजपे मॅडम भौतिकशास्त्र विभाग प्रमुख प्रा. सौ. जे आर बिराजदार मॅडम प्रा. तेलंग मॅडम आणि उपमुख्याध्यापिका सौ. विजयालक्ष्मी भूसणगी मॅडम प्रा. मेघाराणी कलशेट्टी मॅडम सौ.सविता बाके मॅडम(वकील) व माजी विद्यार्थी मुख्याध्यापक श्री शंकर व्हनमाने प्रा. योगेश कबाडे प्रा. अरविंद शिंदे प्रा. प्रकाश सुरवसे डॉ. एम एल गौर श्री धर्मराज अरबळे, व विद्यार्थिनी कुमारी रामपुरे यांनी देखील आपले विचार व्यक्त केले. या मेळाव्याच्या यशस्वीतेसाठी राज्यशास्त्र विभाग प्रमुख डॉ. आप्पासाहेब देशमुख प्रा. निलेश भरमशेट्टी ग्रंथपाल प्रा. आर आर कांबळे प्रा गेनसिद्ध पुजारी प्रा. श्रीकांत जिड्डीमनी डॉ.सी डी अणेकर कार्यालयीन प्रमुख प्रमुख श्री सुहास होटकर ज्येष्ठ लिपिक श्री विरुपाक्ष कुंभार श्री अशोक कोरे श्री राजू चव्हाण व सेवक बाबू बोलदे श्री अभिषेक आळगी श्री परमेश्वर कलबुर्गी श्री सिद्धाराम अरबळे श्री राजू हूच्चे यांनी अधिक परिश्रम घेतले. या मेळाव्याचे सूत्रसंचालन प्राध्यापक प्रकाश सुरवसे यांनी केले. तर आभार डॉ. एम एल गौर यांनी मानले.
