गावगाथा

महेश इंगळे यांच्या शीतगुण व्यक्तीमत्वामुळे लाभलेल्या पुरस्कारांची उंची वाढली – अशोक कलशेट्टी

यशकल्याणी समाजरत्न पुरस्कार सन्मान प्रित्यर्थ महेश इंगळे यांचा स्विमींग ग्रुपच्या वतीने सत्कार.

महेश इंगळे यांच्या शीतगुण व्यक्तीमत्वामुळे लाभलेल्या पुरस्कारांची उंची वाढली – अशोक कलशेट्टी

यशकल्याणी समाजरत्न पुरस्कार सन्मान प्रित्यर्थ महेश इंगळे यांचा स्विमींग ग्रुपच्या वतीने सत्कार.

(श्रीशैल गवंडी, दि.५/५/२०२५.अ.कोट)
आपल्या सर्वांचे मार्गदर्शक सर्वांना सुख दुःखात मदत करणारे मनमिळाऊ व्यक्तीमत्व असलेले महेश इंगळे यांना करमाळा येथे नुकतेच यशकल्याणी ग्रामीण सेवाभावी संस्थेच्या वतीने समाजरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला. एकूणच महेश इंगळे यांच्या अष्टपैलू व्यक्तीमत्त्वात समाज सेवेप्रति सर्व गुण संपन्न व्यक्तीमत्व दडलेले आहे. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे कार्यभार सांभाळतच त्यांनी समाजसेवेतही नियमितपणे महत्त्वाचे योगदान दिलेले आहे. या कार्यासाठी त्यांनी समाजसेवा व धर्मसेवेसाठी जीवन समर्पण केलेले आहे. अशा या उत्तुंग व्यक्तीमत्त्वाचा गौरव म्हणून यशकल्याणी सामाजिक संस्थेच्या वतीने समाजरत्न पुरस्काराने सन्मान करून गौरव झाल्याने माझ्यासह सर्व अक्कलकोट वसियांकरिता व स्विमिंग ग्रुप सदस्यांकरिता अभिमानास्पद ही बाब आहे. आज पर्यंत त्यांना अनेक पुरस्कार लाभलेले आहेत, त्यामुळे या पुरस्कारासाठी त्यांच्या माध्यमातून व्यक्तीमत्त्वाची उपलब्धी महत्वाची नसून त्यांना लाभलेल्या या पुरस्कारामुळे व महेश इंगळे यांच्या शीतगुण व्यक्तिमत्त्वामुळे उलट या पुरस्कारांची उंची वाढलेली आहे असे मनोगत स्विमिंग ग्रुपचे सदस्य अशोक कलशेट्टी यांनी व्यक्त केले. महेश इंगळे यांना करमाळा येथील यश कल्याणी सेवाभावी संस्थेच्या वतीने नुकतेच यशकल्याणी समाज रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. या अभिनंदननीय कार्याची दखल घेऊन येथील स्विमिंग ग्रुपच्या वतीने स्विमिंग ग्रुपचे ज्येष्ठ मार्गदर्शक सुधाकर पाटील यांच्या हस्ते
स्विमिंग ग्रुपचे संस्थापक महेश इंगळे यांचा शाल, पुष्पगुच्छ, श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला. याप्रसंगी अशोक कलशेट्टी बोलत होते. यावेळी स्विमिंग ग्रुपचे सुधाकर पाटील काका, विश्वनाथ देवरमणी सर, मनोज जगताप, अशोक कलशेट्टी, मल्लिनाथ माळी, राजीव एकबोटे, चंद्रकांत सोनटक्के, सुनील पवार, अप्पू पराणे, बाबा सुरवसे, सचिन किरनळ्ळी, अरविंद पाटील, शेखर
आडवीतोटे, शैलेश राठौर, बाळासाहेब एकबोटे, सोमनाथ सुतार, ज्ञानेश्वर भोसले, धनराज स्वामी, दर्शन घाटगे, स्वामीनाथ गवळी, युवराज सोनटक्के, अमित घाटगे, आदित्य गवंडी, ऋतिक माने, प्रसाद माने, अमित नंदीकोले, अंकुश केत मालक इत्यादी दिसत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button