
नागणसुर गावात भारतीय सैनिक निंगणा माड्याळ.यांचा सत्कार सोहळा संपन्न.
अक्कलकोट. ( प्रतिनिधी,)नागणसुर गावातील शेतकरी चंद्रशा माड्याळ यांचे सुपुत्र निंगणा माड्याळ यांना भारतीय सैन्य दलात सेवा करण्याची खुप इच्छा होती. आई वडिल फारसे शिकलेले नव्हते. यांनी स्वतःच्या मनात जिद्द चिकाटी च्या जोरावर होणाऱ्या त्रासाकडे दुर्लक्ष करून यशस्वी होण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करत वयाच्या 21 वर्षी भारतीय सैन्य दलात भरती झाले. वयाच्या 38 वा वर्षी निवृत्त झाले.
17 वर्ष सेवा करुन निवृत्त झाले. याचे पत्नी सुनंदा माड्याळ हे महाराष्ट्र पोलिस दलात 17 वर्षं कार्यरत आहेत.
यानिमित्ताने .नागणसूर गावातील तुप्पाद मठाचे मठाधिपती परमपूज्य डॉ श्री अभिनव बसवलिंग महास्वामीजी यांच्या शुभहस्ते व नागणसुर ग्रामस्थ कडून सत्कार करण्यात आले.या वेळी नागणसुर ग्रामस्थ मित्र परिवार व नातेवाईक उपस्थित होते.
