Akkalkot: भाविकांचे धर्महित जोपासत वटवृक्ष मंदिर समितीची वाटचाल ; न्यायमूर्ती एम.एस.कर्णिक यांचे मनोगत

अक्कलकोट (प्रतिनिधी): माया, ममता, करुणा, दयासागरेचा अखंड झरा अक्कलकोट निवासी ब्रह्मांडनायक श्री वटवृक्ष स्वामी समर्थ महाराजांच्या मूर्त स्वरूपात आहे. यानिमित्त स्वामी भक्तांची संख्या वाढत आहे वाढत असलेल्या स्वामी भक्तांच्या सेवेत देवस्थान सदैव तत्पर आहे. मंदिर समिती स्वामी समर्थांच्या दर्शनार्थ भाविकांसाठी अनेक सोई सुविधा निर्माण करीत आहे, म्हणून भाविकांचे धर्महित जोपासत वटवृक्ष मंदीर समितीची उत्कृष्ट वाटचाल चालू असल्याचे मनोगत मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती एम.एस.कर्णिक यांनी यांनी व्यक्त केले. ते नुकतेच येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरास भेट देऊन श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेतले.

यावेळी मंदिर समितीच्या वतीने समितीचे चेअरमन महेश इंगळे यांनी न्यायमूर्ती एम.एस.कर्णिक यांचा श्री स्वामी समर्थांचे कृपावस्त्र, प्रसाद, प्रतिमा, देऊन यथोचित सन्मान केला. याप्रसंगी न्यायमूर्ती एम.एस. कर्णिक बोलत होते. पुढे बोलताना न्यायमूर्ती एम.एस.कर्णिक यांनी श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान हे श्री स्वामी समर्थांचे मूळस्थान आहे तथा राज्यातील एक प्रमुख धार्मिक स्थळ आहे. समितीचे अध्यक्ष महेश इंगळे यांच्या नेतृत्वाखाली वटवृक्ष मंदिरात होत असलेले विविध कामकाज हे भाविकांच्या सोई सुविधांना प्राधान्य देत मंदिर समिती कार्य करीत आहे म्हणून भाविकांचे धर्महित जोपासत वटवृक्ष मंदिर समितीची सुरू असलेली वाटचाल पाहून समाधान वाटले असेही मनोदय व्यक्त करून मंदिर समितीच्या कार्यास शुभेच्छा व्यक्त केल्या. यावेळी मंदीर समितीचे सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, श्रीशैल गवंडी, विपूल जाधव, श्रीकांत मलवे, प्रसाद सोनार, सागर गोंडाळ व अन्य सेवेकरी तथा भक्तगण उपस्थित होते.
