गावगाथाठळक बातम्या

वरिष्ठ पत्रकार महेश गायकवाड यांना राज्यस्तरीय दर्पणकर आचार्य बाळशास्त्री जांभेकर आदर्श पत्रकार पुरस्कार जाहिर 

अक्कलकोट  (प्रतिनिधी):  सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट येथे होणाऱ्या 111 सुवर्ण रत्नांचा सन्मान सोहळा मधील राज्यस्तरीय आद्य पत्रकार दर्पणकर आचार्य बाळशास्त्री जांभेकर आदर्श पत्रकार पुरस्कार सोलापूर जिल्ह्यातील वरिष्ठ पत्रकार आणि महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ डिजिटल मीडिया चे सोलापूर जिल्हाध्यक्ष व सुयश मिडीयाचे ब्युरो चिफ महेश गायकवाड यांना जाहिर झाला आहे.

 

 बाळासाहेबांची शिवसेना शिंदे गट आणि सोनार हक्क परिषद स्वराज्य पोलीस मित्र आणि पत्रकार संरक्षण आणि माहिती अधिकार संघटना अक्कलकोट यांच्या संयुक्त विद्यमाने देण्यात येणारा 111सुवर्ण रत्नांचा सन्मान सोहळा यामधील आद्य पत्रकार दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर राज्यस्तरीय आदर्श पत्रकार पुरस्कार सोलापूर जिल्ह्यातील वरिष्ठ पत्रकार महेश गायकवाड यांना जाहिर झाला आहे.

या पुरस्काराची घोषणा पंढरपूर येथील मुकुंद वेदपाठक, आंबेजोगाई येथील राजेश भाऊ पंडित, सोलापूर येथील सुनील पंडित, भंडारकवठे येथील संतोष दीक्षित पुणे वाघोली येथील गणेश क्षिरसागर यांच्या निवड समितीने 

अक्कलकोट येथे केली आहे 111 सुवर्ण रत्नांचा सन्मान सोहळा समितीचे प्रमुख आणि ज्येष्ठ पत्रकार व उद्योजक आणि सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत दादा वेदपाठक तसेच निवड समितीने राज्यभरातून विविध क्षेत्रात उत्तम व आदर्श कार्य करणाऱ्या व्यक्तींच्या विविध पुरस्कारासाठी निवडी जाहिर केल्या आहेत 

 

सोलापूर जिल्ह्यातील वरिष्ठ पत्रकार आणि सुयश मीडिया ग्रुपचे ब्युरो चिफ महेश गायकवाड यांनी गेल्या 42 वर्षापासून वृत्तपत्र क्षेत्रात राहून अनेक गुंतागुंतीच्या प्रकरणाला वाचा फोडून अनेकाना आपल्या पत्रकारितेच्या माध्यमातून न्याय मिळवून दिला आहे. रोखठोक आणि निर्भीड पत्रकार म्हणून सोलापूर जिल्ह्यात त्यांची ओळख आहे. आंबेडकरी चळवळीचे अभ्यासू पत्रकार म्हणून महेश गायकवाड यांची सोलापूर जिल्ह्यात ओळख आहे. सुयश मीडिया ग्रुप च्या माध्यमातून त्यांनी तळागाळातील जनतेच्या प्रश्नावर वाचा फोडून त्यांच्या अडीअडचणी दूर केल्या आहेत.

त्यांच्या या निर्भीड आणि रोखठोक पत्रकारितेची दखल घेत त्यांना राज्यस्तरीय आद्य पत्रकार दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर आदर्श पत्रकार पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे.

 

या पुरस्काराचे वितरण विविध मान्यवरांच्या उपस्थितीत आणि अनेक नामवंतांच्या हस्ते रविवार दिनांक 18 मे 25 रोजी दुपारी 2 वाजता फत्तेसिंह चौक येथील सर्जेराव सभागृह येथे प्रदान करण्यात येणार आहे 

या सुवर्ण रत्नांचा सन्मान सोहळा कार्यक्रमात सोलापूर जिल्ह्यातील तमाम जनतेने नागरिकांनी आणि सामाजिक संस्था व सामाजिक मंडळानी उपस्थित रहावे असे आवाहन संयोजन समिती च्या वतीने कार्यक्रमाचे आयोजक चंद्रकांत दादा वेदपाठक यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button