अक्कलकोट तालुक्याला अवकाळी पावसाचा तडाखा ; महावितरणाच्या शिरवळ उपकेंद्र हद्दीतील पिन इन्शुलेटर फुटल्याने वीज पुरवठा खंडित… रात्रीचे एक वाजले तरी….

अक्कलकोट (प्रतिनिधी ): तालुक्याला वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने मंगळवारी सायंकाळी तुफानी पावसाने झोडपले, यात अक्षरशः अनेक ठिकाणी काहींचे घरावरील पत्रे उडाली तर काही ठिकाणी जानावऱ्यांच्या चाऱ्याचीही मोठ्या प्रमाणात नासधूस झाली. याच वादळी वाऱ्या मध्ये अक्कलकोट तालुका महावितरण शिरवळ उपकेंद्रा अंतर्गत येणाऱ्या आसपास च्या गावातील विजेच्या खंबावरील पिन इन्सुलेटर फुटल्याने सायंकाळी पासून विजेची बत्ती गुल झाली असून, या अवकाळी चा फटका महावितरणाला मोठ्या प्रमाणात बसला आहे.

या अवकाळी मध्ये विजेच्या खंबावरील पिन इन्सुलेटर फुटल्याने शिरवळ उपकेंद्र अंतर्गत येणाऱ्या 20 गावे अंधारात बुडाली असून, या गावांतील वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी महावितरण चे उपकार्यकारी अभियंता राजू आडम साहेब, सहाय्यक अभियंता संपत यमगर साहेब, हे आपल्या संपूर्ण टीम सह फिल्डवर रात्रभर पेट्रोलिंग करत विजपुरवठा सुरळीत करण्यासाठी जीवाची पराकाष्ठा करत असल्याचे विदारक चित्र पाहवयास मिळत आहे.

महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी बिघाड शोधून दुरुस्तीची कामे वारा व पाऊस कमी होताच तात्काळ सुरू केली असून, जवळपास 22 ते 25 ठिकाणी पिन इन्सुलेटर फुटून वीज पुरवठा खंडित झाल्याने पिन इन्सुलेटर दुरुस्तीची कामे व दुसऱ्या उपकेंद्रातून व दुसऱ्या फिडरवरुन वीजपुरवठा सुरळीत करता येईल का..? जेणेकरून रात्रभर वीजपुरवठा बंद झाल्याने नागरिकांचे हाल होऊ नये याचीच काळजी घेत महावितरण चे सर्व लाईनमन रात्रभर अंधारात काम करून वीज पुरवठा सुरळीत करण्याच्या प्रयत्नात असताना दिसत आहेत.

हा वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी उपकार्यकारी अभियंताअक्कलकोट-1-.राजू आडम साहेब, सहाय्यक अभियंता-शेख साहेब, संपत यमगर साहेब, कांबळे साहेब, तसेच वरिष्ठ तंत्रज्ञ-कमलेश जाधव, अमित जाधव, बिलाल चाऊस, गूरूशांत वमने, भिमा ऊमराणे, संतोष जिंतूरकर, राजशेखर विभूते, बाह्यस्रोत कर्मचारी-बसू स्वामी, महावितरण वाहन चालक हारून जमादार यांच्या सह अन्य कर्मचारी व अधिकारीवर्ग उपस्थित होते.

————————————————————————
पिन इन्सुलेटर फुटल्याने वीजपुरवठा आहे अनेक तासापासून खंडित
*शेतीचा वीजपुरवठाही बंद*
*लवकरच दुरुस्ती करून वीज पुरवठा सुरळीत करणार*
मंगळवारी सायंकाळी पासून, महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी दुरुस्तीची कामे सुरु केली असून, आतापर्यंत 15 ठिकाणचे पिन इन्सुलेटर बदलून झाले असून, अद्याप काही ठिकाणचे पिन इन्सुलेटर बदलण्याचे काम युद्धपातळीवर सुरु असून, त्यावरील शेतीचा वीजपुरवठा देखील मंगळवारी रात्रीपर्यंत बंद असून, त्यांच्या दुरुस्तीची कामे सुरू असून तातडीने वीजपुरवठा सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे महावितरणच्या अधिकाऱ्यांनी सांगीतले.
काही ठिकाणी शेतीचा वीजपुरवठा खंडित झाला आहे
मंगळवारी सायंकाळी वाऱ्यामुळे मोठ्या प्रमाणात विजेचे पिन इन्शुलेटर फुटल्याने अनेक गावांतील वीजपुरवठा खंडित झाला आहे. हे पिन इन्सुलेट बदलण्याचे काम सध्या युद्धपातळीवर सुरु आहे. काही ठिकाणी शेतीचा वीजपुरवठा खंडित झाला आहे. तेही ट्रान्सफॉर्मर्स सुरू करून तातडीने शेतीचा वीजपुरवठा पूर्ववत केला जाईल.
– राजू आडम , उपकार्यकारी अभियंता महावितरण, अक्कलकोट उपविभाग