गावगाथाठळक बातम्या
Breaking : सततच्या पावसामुळे पुणे सातारा महामार्गावर भेगा ; बांधकामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह..

पुणे (प्रतिनिधी): पुणे-सातारा महामार्गावरील हरिश्चंद्री परिसरात सततच्या पावसामुळे रस्त्याखालची माती खचून मुख्य रस्त्याला मोठ्या भेगा पडल्या, ज्यामुळे वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली.

हरिश्चंद्री येथे सुरू असलेल्या ओव्हरब्रिजच्या कामामुळे तीनपैकी दोन लेन बंद होत्या. केवळ एकाच लेनवरून वाहतूक सुरू असताना, सततच्या पावसामुळे रस्त्याला मधोमध खोल भेगा पडल्या. यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आणि प्रवाशांना तासन्तास वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला.

महामार्ग पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पर्यायी मार्ग दाखवून वाहतूक सुरळीत केली. प्रशासनाने सिमेंटच्या साहाय्याने भेगा भरून काढल्या, परंतु या घटनेने महामार्गाच्या बांधकामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
