गावगाथा

अक्कलकोटमध्येही घुमला भारतीय सैन्यदलाच्या जयघोषाचा गजर…

तिरंगा

अक्कलकोटमध्येही घुमला भारतीय सैन्यदलाच्या जयघोषाचा गजर…
अक्कलकोट ( प्रतिनिधी )
दहशतवादाला आश्रय देणाऱ्या पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर देणाऱ्या आणि त्यांचे दहशतवादी तळ नष्ट करणाऱ्या भारतीय सैन्यदलाच्या शौर्याला सलाम करण्यासाठी शनिवारी अक्कलकोट येथे ‘तिरंगा रॅली’ आयोजित करण्यात आली होती. या तिरंगा रॅलीस अक्कलकोट येथील नागरिकांनी भरभरून प्रतिसाद दिला. अक्कलकोट शहरातील मल्लिकार्जुन मंदिरापासून सुरु झालेले ही तिरंगा यात्रा जुना राजवाडा इथे समाप्त झाली.
‘भारत माता की जय’ आणि ‘वंदे मातरम’ अशा घोषणा देत निघालेल्या या यात्रेत असंख्य नागरिकांनी उत्साहाने सहभाग घेतला. सैन्यदलाच्या पाठीशी देशातील प्रत्येक नागरिक ठामपणे उभा आहे, याचे प्रतिबिंब दर्शवणारी ही तिरंगा यात्रा भारतीय सैन्य दलाचा गौरव आणि सन्मान वाढवणारी होती.
यावेळी विरक्त मठाचे बसलिंगेश्वर महास्वामीजी, नीळकंठ शिवाचार्य मैंदर्गी, आमदार सचिन कल्याणशेट्टी ,आमदार . देवेंद्र कोठे, जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण, अमोलराजे भोसले,. दिलीप सिद्धे, संजय देशमुख, . मिलन कल्याणशेट्टी, सागर कल्याणशेट्टी, अविनाश माडीखंबे, तालुकाध्यक्ष प्रदीप पाटील, अमोल हिप्परगी, सुनील खेड, महेश हिंडोळे, . आनंद तानवडे, . यशवंत धोगडे , सुनील कळके, अप्पू परमशेट्टी, सुरेखा होळीकट्टी, मैनु कोरबु, . आण्णा बालाचारी, आशापा बिराजदार, महेश पाटील यांच्यासह मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button