गावगाथाठळक बातम्या
Akkalkot : कै.रुपालीताई इंगळे यांच्या प्रथम पुण्यतिथी निमित्त कटारे कुटुंबीयांकडून गरजू महिलांना साड्या वाटप

अक्कलकोट, दि.३०. (प्रतिनिधी): श्री वटवृक्ष देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त तथा माजी नगराध्यक्ष महेश इंगळे यांच्या धर्मपत्नी कै. रुपालीताई इंगळे यांच्या प्रथम पुण्यतिथी निमित्त अक्कलकोट चे जेष्ठ समाजसेवक तथा माजी नगरसेवक (शिवसेना) सुनिल कटारे यांच्या कुटुंबीयांकडून गरजू महिलांना साड्या वाटप करण्यात आले.

सुनिल कटारे यांच्या मातोश्री सुशिलाबाई अप्पाराव कटारे यांच्या हस्ते गरजू व गरीब कुटुंबातील महिलांना साड्यांचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी सुनील कटारे यांच्यासह प्राध्यापक शिवशरण अचलेर, अंकुश केत, शिवपुत्र हळगोदे, संतोष इंगोले, प्रसाद पाटील, अशोक कलशेट्टी, स्वामीराव हेगडे आदी उपस्थित होते.
