बाळासाहेब कुंभार यांचा सेवानिवृत्ती सत्कार सोहळा संपन्न
वागदरी (ता. अक्कलकोट) – बीएसएनएल कार्यालय, वागदरी येथे तब्बल २५ वर्षे मनोभावे व प्रामाणिकपणे सेवा बजावलेले. बाळासाहेब मारुती कुंभार यांचा सेवानिवृत्ती निमित्ताने सत्कार सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.
हा सत्कार सोहळा सुनील सावंत यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आला होता. यावेळी वागदरी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच परमेश्वर पोमाजी, प्रा. सुधीर सोनकवडे, मराठा समाजाचे अध्यक्ष . प्रदीप पाटील सर, समाजसेवक शिवराज पोमाजी, गावचे लोकप्रिय सूत्रसंचालक महादेव सोनकवडे, विकास नंजुंदे, नागनाथ अवताडे, नरसप्पा मोहोरकर, मारुती शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.
सत्कारप्रसंगी प्रा. सुधीर सोनकवडे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना कुंभार साहेबांच्या कार्याची प्रशंसा केली. “गावाच्या आणि संस्थेच्या कार्यात प्रामाणिकपणे व निष्ठेने काम करून त्यांनी एक आदर्श निर्माण केला आहे. त्यांच्या पुढील आयुष्यात उत्तम आरोग्य लाभो, आणि त्यांच्या हातून अखंडपणे सत्कृत्य घडोत,” असे शुभेच्छा शब्द त्यांनी दिले.
सत्कार कार्यक्रमानंतर सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत कुंभार साहेबांचा सन्मान करण्यात आला आणि गावकऱ्यांनी त्यांना पुढील आयुष्यासाठी शुभेच्छांचा वर्षाव केला.
Back to top button
×
No WhatsApp Number Found!