शहर अध्यक्ष पदाचा कार्यकाल स्वामी चरणांना समर्पित.स्वामी दर्शनानंतर भाजपा शहर अध्यक्ष रोहिणीताई तडवळकर यांचे मनोगत.
(श्रीशैल गवंडी, अ.कोट, दि.०३/०६/२०२५)
मला लाभलेले भारतीय जनता पार्टीचे शहर अध्यक्ष पद व त्याचा कार्यकाल हा स्वामी चरणांना समर्पित असल्याचे मनोगत येथील श्री.वटवृक्ष स्वामी महाराज मंदीरातील स्वामी दर्शनानंतर भारतीय जनता पार्टीचे सोलापूर शहर अध्यक्ष रोहिणीताई तडवळकर यांनी व्यक्त केले.
ते नुकतेच येथील श्री.वटवृक्ष स्वामी महाराज मंदीरास भेट सहकुटूंब भेट देवून श्री.स्वामी समर्थांचे दर्शन घेतले. यावेळी मंदीर समितीच्या वतीने समितीचे चेअरमन महेश इंगळे यांनी रोहिणी तडवळकर व रामभाऊ तडवळकर यांचा श्री स्वामी समर्थांचे कृपावस्त्र, प्रसाद, प्रतिमा देवून यथोचित सन्मान केला. यावेळी रोहिणीताई तडवळकर बोलत होत्या. पुढे बोलताना तडवळकर यांनी श्री स्वामी समर्थांची मी श्रध्दा पुर्वक भक्त आहे. अशीच श्रध्दा आपल्या पदावरसुध्दा आहे. या विश्वासाने अत्यंत कार्यसचोटी आत्मसात करून पक्षाच्या वतीने सोपविण्यात आलेली जबाबदारी अत्यंत श्रध्देय भक्तीभावाने पार पाडून जनतेची व कार्यकर्त्यांची सेवा करू असा विश्वास व्यक्त केला. यावेळी प्रथमेश इंगळे, भारतीय जनता पार्टीचे पंचायत राज व ग्रामविकास जिल्हा उपाध्यक्ष रविंद्र वाघमोडे, श्रीशैल गवंडी, मंदीर समितीचे सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, श्रीकांत मलवे, ऋषिकेश लोणारी, विपूल जाधव, सागर गोंडाळ व अन्य उपस्थित होते.
फोटो ओळ – भाजपा शहर अध्यक्ष रोहिणीताई तडवळकर व रामभाऊ तडवळकर यांचा वटवृक्ष मंदीरात सत्कार करताना महेश इंगळे, प्रथमेश इंगळे व अन्य दिसत आहेत.
Back to top button
×
No WhatsApp Number Found!