HTML img Tag
शिरशी (ता. अक्कलकोट) येथे विजेच्या तारेचा शॉक लागून चार म्हशी ठार
शिरशी (ता. अक्कलकोट) – शिरवळ येथील माजी सरपंच श्री. बसवराज तानवडे यांच्या शेताजवळ दुपारच्या सुमारास दुर्दैवी घटना घडली. त्यांच्या चार म्हशी शेताजवळ चरण्यासाठी सोडलेल्या असताना, अचानक वीजवाहिनीची तार तुटून जमिनीवर पडली आणि त्या तारेला स्पर्श झाल्याने चारही म्हशी जागीच ठार झाल्या.
घटनेची माहिती मिळताच अक्कलकोट पोलीस स्टेशनचे अधिकारी, पशुधन विकास अधिकारी, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीचे (एमएसईबी) प्रतिनिधी, तसेच स्थानिक तलाठी घटनास्थळी दाखल झाले. अधिकाऱ्यांनी तातडीने पंचनामा करून पुढील कार्यवाही सुरू केली आहे.
या दुर्घटनेमुळे बसवराज तानवडे यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून, गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. स्थानिक प्रशासनाकडून योग्य नुकसान भरपाईची मागणी करण्यात येत आहे.
Back to top button
×
No WhatsApp Number Found!