*🔶अक्कलकोट :* (प्रतिनिधी)
*काँग्रेस आय ने म्हेत्रे कुटुंबीयांना भरपूर काही दिले आहे, मात्र ते आज पक्ष सोडत आहेत, आम्ही मात्र काँग्रेस सोडणार नाही, या पुढील काळात गाव, वाड्या, वस्त्या, तांड्यांपर्यंत पोहोचून काँग्रेस कार्यकर्त्यांना बळ देणार असल्याचे माजी नगराध्यक्ष तथा काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष अशपाक बळोरगी यांनी वागदरी रस्त्यावरील बळवर्गी फार्म हाऊस येथे मंगळवारी आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले.*
सदरची पत्रकार परिषद ही सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटी कार्याध्यक्ष अशपाक बळोर्गी यांनी काँग्रेसचे माजी राज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांचा दि.5 जून रोजी शिवसेना शिंदे गटात प्रवेश होणार असल्याने या पार्श्वभूमीवर पुढील काळात तालुक्यातील काँग्रेस याबाबतचे विवेचन करण्यासाठी पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती.
या पत्रकार परिषदेत अशपाक बळवर्गी यांनी काँग्रेसची 140 वर्षांची वाटचाल तर मैत्री कुटुंबीय व काँग्रेस यांच्याबरोबर गेल्या 40 वर्षापासूनचे कारकीर्द याबाबत बोलताना म्हणाले, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे, कै सातलिंगप्पा म्हेत्रे, माजी आमदार कै. महादेवराव पाटील, व सिद्धाराम म्हेत्रे यांच्या मार्गदर्शन व नेतृत्वाखाली काम केलेले आहोत. आजवर काँग्रेस पक्षाने मान, सन्मान, प्रतिष्ठा मिळवून दिले आहे हे विसरणे अशक्य आहे. त्यामुळे मी यापुढे सुद्धा काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता म्हणून काम करणार असल्याचे सांगून भविष्यात काँग्रेस पक्षाने मला जी जबाबदारी देईल ती जबाबदारी मी प्रामाणिकपणे पार पाडीन काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून अक्कलकोट शहर व तालुक्यातील जनतेच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी व जनतेची सेवा करण्यासाठी मी 24 तास उपलब्ध राहणार असल्याचे याप्रसंगी सांगितले.
पुढे बोलताना म्हणाले, सुशील कुमार शिंदे, खासदार प्रणिती शिंदे यांच्या नेतृत्वाखाली या पुढील काळात काँग्रेस पक्ष बांधणीसाठी सर्व समाजातील सर्व जाती-धर्मातील कार्यकर्ते व लोकांना सोबत घेऊन काँग्रेस पक्षाला पुन्हा गतवैभव प्राप्त करण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करणार आहे असे यावेळी अशपाक बळवर्गी यांनी सांगितले.
पुढील काळातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाला अच्छे दिन येणार आहेत. या काळात काँग्रेस पक्ष कोणाबरोबर सुद्धा युती न करता स्वतंत्रपणे निवडणूक लढविणार आहेत असे सांगून तालुक्यातील इतर पक्षातील मातब्बर नेते मंडळी लवकरच काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. याबाबत लवकरच काँग्रेस पक्षाची सभा घेऊन यामध्ये प्रवेश करणार आहेत. दिनांक पाच जून रोजी लवकरच एक पत्रकार परिषद घेऊन व काँग्रेसची मोठ बांधण्याचा चंग या निमित्ताने करणार आहोत. म्हेत्रेत्च्या तथाकथित प्रवेशाबाबत गाव वाड्या वस्त्या तांड्यातील काँग्रेस कार्यकर्त्यातून भ्रमणध्वनीवरून संपर्क होत आहेत. मेहत्रे कुटुंबीयांनी घेतलेल्या निर्णयाबाबत तीव्र नाराजी कार्यकर्त्यातून व्यक्त होताना दिसत आहे.
या पत्रकार परिषदेस सुनील खवळे, ताजुद्दीन मोगल, बाबू नागुरे, सैपन खान चोपदार, एजाज बळोर्गी, फारुक बबरची, रफिक पठाण, बब्बू होटगी, मुस्तफा बळवर्गी, समर्थ मातोळे आधी जण उपस्थित होते.
मल्लिकार्जुन पाटील नॉट रिचेबल
जिल्हा परिषदेचे माजी सभापती मल्लिकार्जुन पाटील यांच्याबाबत पत्रकारांनी अशपाक बळवर्गी यांना विचारलेल्या प्रश्न त्यांनी मल्लिकार्जुन पाटील हे नॉट रिचेबल असून त्यांचा संपर्क होऊ शकला नाही असे यावेळी बळवर्गी यांनी सांगितले. या पत्रकार परिषदेत अपक्ष माजी नगरसेवक विकास मोरे मोटार सायकल वरून आले आणि गेले.
Back to top button
×
No WhatsApp Number Found!