गावगाथा

निसर्ग परतफेड करीत आहे : वेळीच सावध होऊ या ” —डॉ. लता प्रशांत हिंडोळे

आंतरराष्ट्रीय पर्यावरण दिनानिमित्त विशेष लेख

“निसर्ग परतफेड करीत आहे :
वेळीच सावध होऊ या ” —डॉ. लता प्रशांत हिंडोळे

मानवाच्या आगमनापूर्वी पृथ्वीवर सजीव सृष्टी अस्तित्वात होते त्याचा उल्लेख अनेक ग्रंथात मिळतात. पृथ्वीवर मानवाचे आगमन झाल्यानंतर सुरुवातीच्या काळात म्हणजेच गुहेमध्ये, जंगलामध्ये, डोंगर कपाऱ्यामध्ये राहणारा मानव ज्यास आपण ‘गुहा संस्कृती’ (Cave Culture ) म्हणून संबोधतो. काळाच्या ओघात मानवी जीवन जसजसे गतिशील होत चालले आहे. त्या प्रमाणात मानवी जीवनाशी संबंधित समस्यांची संख्याही वाढू लागली. आज अवकाश संस्कृती (Space Cultue ), कृत्रिम बुद्धिमत्ता( आर्टिफिशियल इंटेलिजन्स ), च्या युगात मानवाने प्रचंड प्रगती केली व आपले जीवन सुखमय केले. ब्रिटनचा अर्थशास्त्रज्ञ वॉल्ट विटमन यांनी,’ औद्योगिक क्रांती बाबत असे म्हटले आहे की, “औद्योगिक विकास म्हणजे मानवी जीवनातील सुखाचे कारंजे आहेत ”
महात्मा गांधीजींनी म्हटल्याप्रमाणे,”There is enough for Man’s need but not for man greed ” याचा अर्थ निसर्गामध्ये मानवाच्या गरजा पूर्ण करण्याची क्षमता आहे पण त्याची दुर्दम्य आशावाद, इच्छाशक्ती मात्र पूर्ण करू शकत नाही. आणि आजचा मानव नेमके हेच करीत आहे. आपले जीवन सुखकर करण्यासाठी निसर्गाकडून सर्व काही ओरब डून घेत आहे, अनेक समस्या आ वासून उभे आहेत. समस्या सोडवण्यासाठी मूलगामी पद्धतीने विचार करून त्याबाबतच्या उपायांचा शोध घेण्याची गरज निर्माण झाली आहे. मानवी जीवनाच्या गतिशीलतेमुळे निर्माण झालेल्या समस्या नैसर्गिक नसून त्या मानवनिर्मित आहेत याची जाणीव मानवाने नाही ठेवल्यामुळे निसर्ग आपणास परतफेड करत आहे.हे आजच्या अनेक हवामान बदलाच्या उदाहरणामुळे दिसून येत आहे. निसर्ग स्वतःचे नियम पाळत असते. पण यात मानवी हस्तक्षेप वाढल्यामुळे ऋतुमानात देखील बदल होत आहेत. जसे आज उन्हाळा ऋतू बदलून पावसाळा होऊ घातलेला आहे, त्या बदलाकडे आपण प्रत्येक जण गांभीर्याने पाहणे अत्यंत आवश्यक झाले आहे.
वास्तविक पाहता मानवी जीवन सुखकर करण्यात निसर्गाचा फार मोठा वाटा आहे.किंबहुना मानवाने निर्माण केलेल्या नैसर्गिक असमतोलावर निसर्ग उपाय करीत असतो. परंतु असा
असमतोल सतत वाढत असल्यामुळेच निसर्ग मानवासमोर अनेक आव्हाने उभे करीत आहे. अशाप्रकारे होऊ घातलेल्या गंभीर समस्यावर वेळीच विचारमंथन होऊन आपल्या कृतीद्वारे निसर्ग वाचवण्याचे कार्य हे प्रत्येक जण केले तरच आपण सुरक्षित राहू शकतो. अन्यथा अलीकडच्या काळातील नैसर्गिक घटकांचे रौद्ररूप कधी कधी केदारनाथच्या रूपात तर कधी देवभूमी केरळ मधील नैसर्गिक आपत्ती मधून आपण अनुभवत आहोत.
आज देश ज्या समस्यांना सामोरे जात आहे त्यापैकी एक महत्त्वाची समस्या म्हणजे पर्यावरणीय समस्या,, हवा, पाणी, माती, जंगलाचा ऱ्हास व ध्वनी प्रदूषण म्हणजेच निसर्गात होत असलेल्या बदलांकडे डोळसपणे वेळीच आपण पाहू शकलो नाही तर खूप मोठे अनर्थ होऊ शकतो.
निसर्गाचा इतिहास पाहिला असता अशा अनेक नैसर्गिक उद्रेकामुळेच मानवी जीवन संपुष्टात आलेले आहे. एकेकाळ ची कृष्णेची द्वारिका, हडप्पा संस्कृती, इजिप्तची संस्कृती याचे ज्वलंत उदाहरण आहेत.
आज वैज्ञानिक शोधामुळे व तांत्रिक प्रगतीमुळे जग जवळ आले आहे. प्रगतीच्या दिशा व्यापक बनल्या आहेत. तथापि त्याचबरोबर आलेल्या व मानवी जीवनाला हानिकारक ठरणाऱ्या घटकांकडे आपले म्हणावे तसे लक्ष गेले नाही, परिणामी नैसर्गिक समतोल बिघडत आहे. प्रचंड वेगाने होत असलेले औद्योगीकरण, शहरीकरण, सुविधांमध्ये झालेली वाढ, जंगलतोड करून उभा राहिलेली सिमेंट काँक्रीटची जंगले इत्यादीमुळे आज आरोग्याचे प्रश्न, पाण्याचे प्रश्न, नागरी सुविधांचे प्रश्न सतत भेडसावत आहेत. मोठ्या शहरातील कचऱ्याचे व्यवस्थापन कसे करावे हे एक आव्हान राहत आहे. ध्वनी प्रदूषण, मोबाईल प्रदूषण यामुळे मानवी जीवन नव्हे तर बालकांचे जीवन,लहान मुलांचे जीवन आपण पालक धोक्यात घालत आहोत.
या सर्वांवर वेळीच उपाययोजना करण्यासाठी जागतिक संघटनेने 2015 ते 2030 पर्यंत सतरा उद्दिष्टे चिरस्ताई विकासासाठी निश्चित केलेली आहेत. त्यातील निसर्गाशी संबंधित तेराव्या क्रमांकाचे उद्दिष्ट म्हणजे हवामान बदल हा आहे. त्याचबरोबर स्वच्छ ऊर्जा, हरित ऊर्जा, चिरस्ताई शहरे, स्वच्छ पाणी व स्वच्छता अशा अनेक उद्दिष्टांच्या पूर्तते करता जागतिक संघटना अथक प्रयत्न करीत आहे. परंतु जागतिक राजकारणामधील अमेरिका याकडे म्हणावे तसे लक्ष देत नाही. विशेषतः डोनाल्ड ट्रम्प दुसऱ्यांदा राष्ट्रापती झाल्यानंतर या संघटनेतून बाहेर आलेले आहेत. आपल्या देशात अनेक प्रकारचे कायदे केले जातात, कायद्याच्या अंमलबजावणी करता मात्र कोणतीच यंत्रणा सक्षमपणे काम करत नाही. पर्यावरण रक्षण हे केवळ कागदावरच राहून जात आहे. एक जागरूक नागरिक म्हणून आपण याकडे लक्ष दिले पाहिजे असे मला वाटते. थोडक्यात आपण निसर्गामध्ये जे पेरत आहोत तेच निसर्ग आपल्याला दुपटीने परत देत आहे. याबाबत सर्वांनीच जागृत होणे अत्यंत आवश्यक असून जनजागृती ही केवळ 5 जून या आंतरराष्ट्रीय पर्यावरण दिनापुरतं मर्यादित न राहता ती एक चळवळ होणे अपेक्षित आहे. देशामध्ये 2021 च्या अहवालानुसार दरवर्षी 34 लाख टन प्लास्टिक कचरा निर्माण होत आहे. यातील केवळ 60% कचरा हा रिसायकल करता उपयुक्त आहे. या विविध समस्यांवर उपाय म्हणजे महिला या घरगुती स्वरूपामध्ये पर्यावरण रक्षण करू शकतात, पिशव्या घेऊन बाजारात येणे.पुरुष मंडळी व्यवस्थितपणे केले प्लास्टिकचा वापर, कॅरीबॅगचा वापर कमी होईल. वर्तमानपत्राचे रद्दीतून कागदी पिशव्या तयार करून विक्रीस ठेवणे. अनेक छोटे छोटे उपायद्वारे आपण निसर्गाला वाचवू शकतो. हे केले तरच मानवी जीवन सुखकर होईल अन्यथा निसर्गाचा प्रकोप झाल्यास आपण कोणीच या पृथ्वीतलावर असणार नाही. तिचे छोटे छोटे झलक आपल्याला पहावयास मिळत आहेत. सुजाण नागरीक हो वेळीच जागे होऊ या. निसर्गाचे रक्षण करूया आणि जगा व जगू द्या हा मूलमंत्र जागवू या.
डॉ. लता प्रशांत हिंडोळे
भूगोल विभाग,
सी.बी. खेडगी महाविद्यालय, अक्कलकोट
चौकटीमध्ये ( 2025 यावर्षी UNEP ने “Ending Plastic Pollution ” हे मुख्य उद्देश घेऊन पर्यावरण रक्षण करण्याचा विडा उचलला आहे. दरवर्षी 5 जून हा आंतरराष्ट्रीय पर्यावरण दिन म्हणून साजरा केला जात आहे. आपण नागरिक देखील यामध्ये सकारात्मकपणे भाग घेऊन पर्यावरणाचे रक्षण करावे. केवळ चर्चासत्रे, परिषदा, पुरस्कार, वृक्षारोपणाचे फुगवलेले आकडे यातून फारसे काही साध्य होऊ शकणार नाही. आपण सर्वांनी जमिनीवर राहून काम केल्यास पर्यावरण चळवळ हे निश्चितपणे निर्माण होईल. निसर्गाला सुरक्षित करून आपण देखील सुरक्षित राहू या.
डॉ. शिवराया आडवीतोट

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
WhatsApp Group