सलगर येथे गुरुवारपासून यात्रा प्रारंभ
जय हनुमान कारुणी दोन दिवशीय यात्रा महोत्सव सलगर
अक्कलकोट दि. १० – तालुक्यातील सलगर येथे सालाबादाप्रमाणे यंदाच्या वर्षीही श्री शिव बसवेश्वर विरक्त मठाचे मठाधिपती
परमपूज्य श्री. निंगय्या देवरु महास्वामीजी यांच्या दिव्य सानिध्यात श्री जय हनुमान कारुणी यात्रा- महोत्सव निमित्त विविध धार्मिक व सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
यानिमित्त गुरुवार ( दि. १२ ) व्हन्नुगी, पहाटे जय हनुमान मुर्तीस महारुद्राभिषेक, सकाळी कळसारोहण, दुपारी पालखी उत्सव, नंदीध्वज, कुंभ व मिणीदोरसहीत पालखी व रथोत्सव कार्यक्रम सायंकाळी ७ वाजेपर्यंत भव्य सवाद्य मिरवणूक काढण्यात येणार आहे. यावेळी शोभेचे दारुकाम व रथोत्सव कार्यक्रम संपन्न होईल.
त्यानंतर रात्रौ १० वाजता
श्री जय हनुमान पारिजात भजनी मंडळ व श्री महादेव भजना मंडळ,सलगर यांचा भजन कार्यक्रम होणार आहे.
शुक्रवार ( दि.१३ ) कारुणी यात्रा महोत्सव पहाटे ३ ते सकाळी ७ पर्यंत दंडवत व सकाळी ७ ते दुपारी १२ पर्यंत बैलांचे मिरवणूक, मंदिर परिसरात दुपारी १२ ते सायंकाळी ६ :०० पर्यंत कारुणी बैल गाड्यांचे पळविण्याचा भव्य कार्यक्रम होणार आहे.
शनिवार ( दि. १४ ) रोजी दिवसभर कलगीतुरा गाणे लाडकी, डप्पीन पदा भजन मंडळ विद्याश्री मशीबनाळ – विजयपूर श्री. मौलासाहेब मकानदार यांचे सुंदर भजन
कार्यक्रम होणार आहे.
परगावहून आलेल्या भक्तगणांना पिण्याच्या पाण्याची व महाप्रसादाची सोय केलेली आहे.
तरी सर्व सदभक्तांनी याञेत सहभागी होण्याचे आवाहन
श्री जय हनुमान कारुणी यात्रा पंचकमिटीने केले आहे.
चौकट ……..
तालुक्यातील सलगर येथे श्री जय हनुमान कारहुणवी याञेला अनन्य साधारण महत्त्व आहे.यामध्ये महाराष्ट्रसह कर्नाटकातील हजारो भाविक सहभागी होतात. हा नेत्रदीपक उत्सव सोहळा पाहण्यासाठी आबालवृद्ध – लहान मुलांसह
नागरिक व महिला वर्ग मोठी गर्दी करतात. विशेषतः उत्सवात सर्व जाती धर्मातील भाविक सहभागी होऊन भारतीय संस्कृतीचे दर्शन घडवितात.
—— सुनिल पाटील
सामाजिक कार्यकर्ता सलगर.
Back to top button
×
No WhatsApp Number Found!