सामाजिक बांधिलकी

हजारो सोलापूरकरांच्या उपस्थितीत सागर सिमेंट आयोजित 1 लाख वह्या वाटप शुभारंभ संम्पन्न

सागर सिमेंट लिमिटेडच्या माध्यमातून होत असलेल्या गरीब व होतकरू विद्यार्थ्यांकरीता वही व सायकल वाटप

हजारो सोलापूरकरांच्या उपस्थितीत सागर सिमेंट आयोजित 1 लाख वह्या वाटप शुभारंभ संम्पन्न

दिनांक ४ जुलै सोलापूर –

 

सागर सिमेंट लिमिटेडच्या वतीने जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिकणाऱ्या गरीब गरजू विद्यार्थ्यांसाठी एक लाख वही वाटप कार्यक्रमाचा शुभारंभ जामगुंडी मंगल कार्यालय (वृंदावन लॉन्स) जुळे सोलापूर येथे हजारोंच्या प्रचंड जनसमुदायाच्या उपस्थितीत मोठ्या उत्साही वातावरणात संपन्न झाला.

प्रारंभी कार्यक्रमाचे प्रास्ताविक सागर सिमेंटचे महाराष्ट्र राज्य मुख्य व्यवस्थापक महादेव कोगनुरे यांनी केले.

 

या कार्यक्रमाप्रसंगी सागर सिमेंट आणि एम के फाउंडेशनचे माहितीपट दाखविण्यात आले. तसेच दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आले.
यावेळी व्यासपीठावर सोलापूरचे खासदार डॉ जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामीजी, बसवारूढ मठाचे शिवपुत्र महास्वामीजी, वेदमूर्ती महांतेश हिरेमठ स्वामीजी, सोलापूर जिल्हा परिषदेचे CEO दिलीप स्वामी, सागर सिमेंट चे मालक सिध्दार्थ रेड्डी, सागर सिमेंट CMO राजेश सिंग, सागर सिमेंट मुख्य व्यवस्थापक महादेव कोगनुरे, जयहिंद शुगर्सचे बब्रुवान काका माने देशमुख, महाराष्ट्र बिल्डर्स असोसिएशनचे अध्यक्ष दत्ता मामा मुळे , व्याख्यान केसरी बसवराज शास्त्री हिरेमठ, सागर सिमेंटचे डिस्ट्रीब्युटर आनंद लोणावत, सुरेश शर्मा, हनुमान अगरवाल, श्री प्रतीक चौधरी, अनुज जैन, दिपक जिंदल , प्रशांत पोपली उपस्थित होते.

यावेळी विविध मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले.

सागर सिमेंटच्या वतीने हा उपक्रम सोलापूर जिल्ह्यातील अद्वितीय उपक्रम असुन येणाऱ्या काळात गरीब होतकरू विद्यार्थ्यांची जाणीव ठेवून नक्कीच आपले भविष्य घडवतील आणि अशा उपक्रमासाठी माझे आशीर्वाद सदैव राहील असे प्रतिपादन खा. डॉ.जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी यांनी केले.

सागर सिमेंट लिमिटेडच्या माध्यमातून होत असलेल्या गरीब व होतकरू विद्यार्थ्यांकरीता वही वाटप व सायकल वाटपाचे कौतुक जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी स्वामी यांनी केले व समाजात अशा उपक्रमांची गरज असून सागर सिमेंट लिमिटेड व एम के फाउंडेशनच्या माध्यमातून उत्तमरीत्या हे कार्य सुरू आहे असे प्रतिपादन केले.

सागर सिमेंटचे सोलापुरातील अव्वल स्थान बघून गर्व वाटतो व याचे संपूर्ण श्रेय महादेव कोगानुरे यांचे आहे व महाराष्ट्रासाठी भविष्यात अजून अनेक योजना आम्ही आखणार आहोत अशी माहिती कंपनीचे मालक सिद्धार्थ रेड्डी यांनी दिली.

याप्रसंगी एक लाख वही वाटप कार्यक्रमाचा शुभारंभ तसेच अकरा शाळेच्या अकरा विद्यार्थ्यांना लकी ड्रॉ च्या माध्यमातून मोफत सायकल देण्यात आल्या. तसेच सागर सिमेंटचे अधिकारी डीलर्स, रिटेलर्स, विक्रेते,विविध स्तरातील मान्यवर पदाधिकारी,विविध शाळेचे विद्यार्थी, शिक्षक तसेच एम के फाउंडेशन चे सर्व पदाधिकारी, संचालक, कार्यकारी, संचालक सदस्य कार्यकर्ते शहर व तालुका परिसरातील हजारो लोक उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्वेता हुल्ले यांनी केले तर आभार प्रदर्शन शिवाजी राठोड यांनी मांडले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button