जागतिक लिंगायत महासभेच्या सोलापूर वतीने
`बसव प्रतिभा पुरस्कार’ पुरस्कार वितरण
सोलापूर
जागतिक लिंगायत महासभा सोलापूर च्या वतीने १०वी आणि १२वीच्या गुणवंत विद्यार्थ्यांसाठी ‘बसव प्रतिभा’ पुरस्कार वितरण सोहळा आयोजित केल्याचे माहिती जागतिक लिंगायत महासभा महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष विजयकुमार हत्तुरे एका प्रसिद्धी पत्रकान्वय कळविले आहे.
हा पुरस्कार सोहळा शनिवार, १४ जून रोजी सकाळी ९.३० वाजता येथील हत्तुरे वस्ती येथील मातोश्री सिद्धव्वाबाई हत्तुरे सांस्कृतिक भवन येथे होणार आहे. हा पुरस्कार जिल्ह्यातील लिंगायत समाजातील सर्व पोट जाती मधील दहावीत ९० टक्क्यांहून अधिक आणि बारावीत ८० टक्क्यांहून अधिक गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांना प्रदान केला जाईल.
धुत्तरगाव-उस्तुरीचे पूज्य कोरणेश्वर महास्वामीजी आणि अक्कलकोट विरक्त मठाचे बसवलिंग महास्वामीजी यांच्या सानिध्यात, सोलापूरचे सरकारी प्रथम दर्जा कंत्राटदार परमानंद अलगोंड -पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सोलापूर एम.के. फाउंडेशनचे चे संस्थापक महादेव कोगनुरे कार्यक्रमाचे उद्घाटन करणार आहेत.
द.सोलापूर शिवसेना युवा नेते अमर पाटील, जागतिक लिंगायत महासभा महाराष्ट्र अध्यक्ष राजशेखर तम्बाके, कार्याध्यक्ष विजयकुमार हत्तुरे , कलबुर्गी अध्यक्ष प्रभुलिंग महागावरकर, सचिव आर.जी. शटगार, नवी मुंबईचे माजी उपमहापौर शशिकांत बिराजदार, शासकीय कंत्राटदार रेवणसिद्ध बिज्जरगी, प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष वीरभद्र यादवाड, सामाजिक कार्यकर्ते वीरेंद्र हिंगमिरे, यांच्या उपस्थितीत पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे. ड्रीम फाऊंडेशनचे काशिनाथ भतकुणकी, नेट-सेट परीक्षेत विश्वविक्रम वीर दानय्या कवटगीमठ यांचे विद्यार्थ्यांना विशेष मार्गदर्शन होणार आहेत.
समाजाच्या विविध क्षेत्रात उत्तम कामगिरी केलेल्या लायन्स क्लबचे गव्हर्नर राजशेखर कापसे, सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नवीन संचालिका इंदुमती अलगोंड-पाटील, सि.बी.खेडगी महाविध्यालयचे नूतन प्राचार्य डॉ. गुरलिंगप्पा धबाले, तरुण अभियंते प्रज्वल चलगेरी, रितेश पाटील, ऋग्वेदी पाटील यांचा सन्मान होणार आहे.
लिंगायत समाज बांधव आणि विद्यार्थी, त्यांचे पालक मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे,जागतिक लिंगायत महासभेच्या सोलापूर जिल्हा अध्यक्ष शिवानंद गोगाव, महिला अध्यक्षा राजश्री थलंगे यांनी आवाहन केले आहे.
Back to top button
×
No WhatsApp Number Found!