गावगाथा

जय भारत माता सेवा समितीचे राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष सदगुरु ॐ श्री हवा मल्लिनाथ महाराज यांच्या देश भक्ती रथ यात्राचे सोलापुरात जोरदार जंगी स्वागत

शहीद हुतात्मा भगतसिंग यांचे जन्मस्थानी खटकर कलान पंजाब येथे जाणाऱ्या

 

जय भारत माता सेवा समितीचे राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष सदगुरु ॐ श्री हवा मल्लिनाथ महाराज यांच्या देश भक्ती रथ यात्राचे सोलापुरात जोरदार जंगी स्वागत

शहीद हुतात्मा भगतसिंग यांचे जन्मस्थानी खटकर कलान पंजाब येथे जाणाऱ्या जय भारत माता सेवा समितीचे राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष सदगुरु ॐ श्री हवा मल्लिनाथ महाराज यांच्या देश भक्ती रथ यात्राचे सोलापुरात जोरदार जंगी स्वागत करण्यात आला.
निस्वार्थ भावनेने, देशभक्तीचा संदेश देशभर घेऊन जाणारी ही देशभक्ती यात्रा असून महान स्वांतत्र्यवीर भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांचा आदर्श घेऊन पुन्हा असे देश भक्त निर्माण व्हावा या उद्देशाने असे देशभक्ती कार्यक्रम आयोजित केला आहे. यात्रेत महाराष्ट्र, तेलंगणा, आंध्र प्रदेश, कर्नाटक राज्यातील विविध जिल्ह्यातील देश भक्त हजारो वाहनांसह सहभागी झाले आहेत. ही रथ यात्रा तुळजापूर नाका वरून रूपा भवानी मंदिर मार्गे जुना पुना नाका जवळ आल्यावर सदगुरु श्री ॐ हवा मल्लिनाथ महाराज यांच्या अमृत हस्ते छत्रपती संभाजी महाराज पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी हजारो देश भक्तांनी या यात्रेत सामील होऊन बोलो भारत माता की जय ! वंदे मातरम् ! भगतसिंह राजगुरु सुखदेव अमर रहे!चा जय घोष करीत सारा परिसर दुमदुमून सोडला.
देशाच्या स्वांतत्र्यसाठी आपले अमूल्य जीवनाची बलिदान दिलेली महान स्वांतत्र्यवीर भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांचा अमर बलिदान दिनानिमित्त जय भारत माता सेवा समितीचे राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष सदगुरु श्री ॐ हवा मल्लिनाथ महाराज यांच्या दिव्य सानिध्यात गुरुवार दि.२३ मार्च २०२३ रोजी पंजाब राज्य, पाकिस्तान सरहद्दीवर शहीद भगतसिंग यांचे जन्मस्थानी खटकर कलान येथे ऐतिहासिक देश भक्ती कार्यक्रम आयोजित केले आहेत. सदर कार्यक्रमांमध्ये शहीद भगतसिंग, सुखदेव, राजगुरू,चंद्रशेखर आझाद, भलतसिंह, राजगुरू,अश्फाकउल्लाह खान, उदम सिंग,झांसी राणी लक्ष्मीबाई, कितूर राणी चन्नम्मा,संगोळगी रायणा आदी शहीद परिवारातील सदस्यांचा व
त्यांच्या वारसांचा सदगुरु श्री ॐ हवा मल्लिनाथ महाराज यांच्या दिव्य सानिध्यात सन्मान व गौरव करण्यात येणार आहे.
त्यानिमित्त बुधवार दि.१५ मार्च २३ रोजी सकाळी कर्नाटकातील आळंद तालुक्यातील जय भारत माता मंदिर येथून यात्रेला सुरुवात झाली. कर्नाटकातील कलबुर्गी, कमलापुर, हुमनाबाद, बंगला मार्गे महाराष्ट्रातील उमरगा, तुळजापूर, सोलापूर मार्गे भिगवणाला रवाना झाले. येथून पुणे,मुंबई,नाशिक मार्गे मध्यप्रदेश, राजस्थान आणि हरियाणा या विविध राज्यांतून ही यात्रा बुधवार दि.२२ मार्च २०२३ पर्यंत खटकर कलान पंजाब येथे पोहचणार आहे.

चौकट
सद्गुरु श्री ॐ हवा मल्लिनाथ महाराजानी  देशच माझे घर,देशच माझे परिवार तसेच देश पहिला नंतर सर्व काही या प्रमुख उद्देशाने जय भारतमाता सेवा समितीची स्थापना केली आहे. शिवभक्तांनी आपले जिवन सार्थक करून शिवभक्तीतुन देशभक्ती मार्गाकडे वळावे, म्हणून  आंध्रा, कर्नाटका, गुजरात आणि महाराष्ट्र अशा अनेक राज्यासह संपूर्ण देशभरात सुमारे साडेसहा हजारोहून अधिक शिवलिंग देवस्थानाची उभारणी केली आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button