वळसंग टोलनाक्याचे मासिक पास द्या अन्यथा रिपाइंचे आंदोलन-अविनाश मडिखांबे.
वळसंग टोलनाक्याचे मासिक पास द्या अन्यथा रिपाइंचे आंदोलन-अविनाश मडिखांबे.

वळसंग टोलनाक्याचे मासिक पास द्या अन्यथा रिपाइंचे आंदोलन-अविनाश मडिखांबे.

अक्कलकोट (प्रतिनिधी)दि१६ :- अक्कलकोट ते सोलापूर या राज्य महामार्गावर वळसंग गावाजवळील टोलनाका गेल्या एक ते दिड वर्षापासून चालू आहे पण वाहनधारक व शेतकरी बांधवाना मासिक पास दिले जात नाही.पास द्या नाहितर रिपब्लीकन पक्षाच्या वतिने तिव्र आंदोलन छेडण्याचा इशारा अक्कलकोट रिपाइं तालुका अध्यक्ष अविनाश मडिखांबे यांनी दिला आहे.
टोलनाका सुरुवात करतांना येथील आजूबाजूला असणाऱ्या गावातील वाहनांना टोलमुक्त करण्यात आले होते.अक्कलकोट तालुक्यातील व शहरातील नागरिकांना मासिक पास म्हणुन 315 रुपये घेऊन पास देण्यात येत होते. त्यामुळे सोलापूरला जाणाऱ्या अनेक छोट्या मोठ्या व्यावसायिकांना व सर्वसामान्य नागरिकांना याचा लाभ मिळत होता.परंतु आता टोलनाक्याचे नवे ठेकेदार यांनी कोणाच्या सांगण्यावरून पुर्वी देण्यात येणारे मासिक पास बंद केले आहे. ठेकेदाराची मनमानी आहे का सर्व सामान्य जनतेला लुटायचे हा धंदा सुरु केले आहे. टोलनाक्याच्या अशा मनमानी कारभारामुळे अनेकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. तरी मा. जिल्हाधिकारी तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी व वळसंग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांनी त्वरित वळसंग टोलनाक्याचे ठेकेदारांना बोलावून मासिक पास चालू करण्यास सांगावे अन्यथा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या वतीने खळखट्याक आंदोलन करण्यात येईल असा इशारा रिपाइंचे अक्कलकोट तालुका अध्यक्ष अविनाश मडिखांबे व रिपाइं शहर अध्यक्ष अजय मुकणार,यांनी दिला आहे.
