बारामती तालुक्यातील काऱ्हाटी गावच्या ग्रामपंचायत चा अजब-गजब कारभार ; गरिबांवर अतिक्रमणाची कार्यवाही होते आणि ग्रामपंचायत सरपंच / सदस्य यांची पाठराखण…. जन संग्राम संघटनेचा आरोप


बारामती तालुक्यातील काऱ्हाटी गावच्या ग्रामपंचायत चा अजब-गजब कारभार ; गरिबांवर अतिक्रमणाची कार्यवाही होते आणि ग्रामपंचायत सरपंच / सदस्य यांची पाठराखण…. जन संग्राम संघटनेचा आरोप (प्रतिनिधी ): बारामती तालुक्यातील काह येथे जे भूमीहीन गरीब लोक आहेत त्यांच्यावर आकसेपोटी राजरोसपणे अतिक्रमणाची कार्यवाही केली जाते त्यांना बेघर केले जाते . त्यांचे कुटुंब रस्त्यावर आणले जाते . थोडी सुद्धा माणुसकी न ठेवता गरिबांवर अन्याय केला जातो आणि याउलट ग्रामपंचायत सरपंच / सदस्य यांचेवर कोणतीही कार्यवाही न करता त्यांना पाठीशी घातले जाते . म्हणजे गरिब लोकांना उपाशी आणि प्रशासनातील लोकांना तुपाशी ठेवले जाते असा गजब कारभार सध्या ग्रामपंचायत काऱ्हाटी करतानाचे चित्र स्पष्ट दिसून येत आहे .

अतिक्रमणाची कार्यवाही गरिबांवर ज्या तत्परतेने ग्रामपंचायत प्रशासनाने केली ती तत्परता सरपंच / सदस्य यांचे वास्तवीक मूळ बांधकाम आणि त्याच्या लगतच्या शासकीय जागेवर वाल कंपाउंड किंवा इतर बांधकाम करून ते अतिक्रमण केले गेले आहे का नाही हे तपासून त्यांचे वर कार्यवाही करण्यात यावी अशा आशयाचे वारंवार पत्रव्यवहार करूनही त्यांचे वर कोणतीही कार्यवाही केली गेली नाही ही बाब अतिशय निंदनीय आहे . असा आरोप जनसंग्राम संघटनेने केला आहे.

दरम्यान , स्वप्निल हनुमंत थोरात (संस्थापक उपाध्यक्ष जन संग्राम संघटना महाराष्ट्र राज्य) यांनी ग्रामपंचायत अधिकारी निलेश धारकर यांना लेखी निवेदन देऊन विनंती केली आहे , ज्या तत्परतेने आपण गरिबांचे अतिक्रमण काढले त्याच तत्परतेने सरपंच / सदस्य यांचे अतिक्रमण तपासून कार्यवाही करावी अन्यथा ग्रामपंचायत कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण करण्यात येईल असा इशारा दिला आहे . निवेदन देताना स्वप्निल थोरात, जगजीत जगन्नाथ, दादा बबन कडाळे, धिरज आवाडे, प्रदेश शेलार आदी उपस्थित होते .
