गावगाथा

*गवसलेलं सोनं*

आज मी तुमच्यासमोर "सालगड्याची मुलगी आणि तिने शाळेत सापडलेली सोन्याची रिंग परत करून दाखवलेला प्रामाणिकपणा" या विषयावर थोडं बोलणार आहे.

*गवसलेलं सोनं*

नमस्कार ,

आज मी तुमच्यासमोर “सालगड्याची मुलगी आणि तिने शाळेत सापडलेली सोन्याची रिंग परत करून दाखवलेला प्रामाणिकपणा” या विषयावर थोडं बोलणार आहे.

मित्रांनो,
आपल्या आजूबाजूला अनेक घटना घडतात. पण काही घटना आपल्या मनावर कायमचा ठसा उमटवतात. अशीच एक गोष्ट आहे – दिव्या दीपक सूर्यवंशी हिची.

दिव्या – चाळीसगाव जिल्हा जळगांव येथील ही मुलगी.
परंतु वडील सालगडी म्हणून मुंगशी R येथे भैया माळवदे यांच्या शेतात राहिले असल्यामुळे पूर्ण कुटुंब मुंगशी R माळवदे यांच्या शेतात स्थलांतरित झाले. तिचे आई-वडील शेतमजुरी करून घर चालवत होते.ती शिक्षणासाठी रोज 2 किमी अंतर पायी चालून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मुंगशी R येथे येत होती. तिच्या डोळ्यांत होती स्वप्नं – शिकून मोठं होण्याची, आई-वडिलांचे आयुष्य उजळवण्याची.

परवा तिला शाळेच्या मैदानात स्वच्छता करत असताना एक सोन्याची रिंग सापडली.

तिच्या मनात वादळ उठलं —
“ही रिंग घरी आई वडिलांना दिली तर ती विकून पैसे येतील
त्या पैशातून तिला पाहिजे ते सगळं येईल.”
“पण… हे माझं नाही… आई म्हणते ना, चुकीचं घेतलं की ते कधीच टिकत नाही.”
पण तिला आठवलं — आईने शिकवलेलं वाक्य,
“जे आपलं नाही, त्यावर कधीच डोळा नको.”

तिने ती 7500 रुपयाची सोन्याची रिंग मुख्याध्यापक श्री चवरे सर यांच्याकडे दिली.
ती रिंग होती संजीवनी संदेश कुरुंद हिची.लगेच मुख्याध्यापकांनी
तिच्या वडिलांना बोलवून घेतले आणि घडलेली घटना सांगितली.
श्रावणीच्या प्रामाणिकपणामुळे त्याचं नुकसान टळलं. सर्वांना कौतुक वाटले की सालगड्याची मुलगी असताना सुद्धा एवढा मोठा प्रामाणिकपणा तिने दाखवला.
प्रामाणिकपणाचे बक्षीस म्हणून संदेश कुरुंद यांनी लगेच तिला पाचशे रुपये बक्षीस आणि
दिली माणूसकीची शाबासकी. तिचं नाव शाळेच्या गौरवफलकावर लिहिलं गेलं.
गावात तिच्या प्रामाणिकपणाची चर्चा झाली.

*त्यादिवशी दिव्याला कोणतं सोनं मिळालं नव्हतं, पण तिने जी प्रामाणिकपणाची शिकवण दिली, ती सोन्यासारखीच अमोल होती.*

मित्रांनो,
आजच्या काळात प्रत्येकजण यश, पैसा, प्रसिद्धी मिळवण्यासाठी धावतोय. पण खरं यश तेच असतं जे आपण आपल्या चारित्र्याने मिळवतो.

*प्रामाणिकपणा म्हणजे काय?*
*तो म्हणजे आपल्या मनाशी प्रामाणिक राहणं, चुकीचं न* *करता योग्य ते करणं — अगदी कोणी बघत नसतानाही.*

*दिव्यासारखं वागायला खूप मोठं मन लागतं. आपल्यापैकी प्रत्येकाने तिच्याकडून शिकायला हवं.*

कारण…

*पैसा हरवला तर थोडं काही हरवतं, पण प्रामाणिकपणा हरवला तर सगळंच हरवतं.”*

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button