

वारकऱ्यांच्या सेवेत नैतिक लँड डेव्हलपर्सचा सहभाग : हडपसरमध्ये फराळ व पाणी वाटप
हडपसर, पुणे –
आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर हडपसर परिसरात नैतिक लँड डेव्हलपर्स तर्फे वारकऱ्यांना फराळ व पाणी वाटपाचा उपक्रम राबवण्यात आला. या उपक्रमाचे आयोजन नैतिक लँड डेव्हलपर्सचे प्रमुख मा. सुनील चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.


विठुरायाच्या नामस्मरणात हरवलेले वारीकरी आपल्या पायी प्रवासात थकलेले असतानाच, त्यांच्या सेवेसाठी हे वाटप केंद्र ठरले. शुद्ध पाणी आणि पौष्टिक फराळाचे वाटप करून वारकऱ्यांना ऊर्जा देण्याचा सुंदर उपक्रम यावेळी पार पडला. सामाजिक जबाबदारीची जाण ठेवत गेल्या अनेक वर्षांप्रमाणे यंदाही नैतिक लँड डेव्हलपर्सचा हा उपक्रम उल्लेखनीय ठरला.

या सेवाभावी कार्यक्रमा प्रसंगी हडपसरचे माजी नगरसेवक मा. मारुती आबा तुपे विशेष उपस्थित होते. त्यांनी वारकऱ्यांशी संवाद साधून त्यांचं मनोबल वाढवलं व नैतिक लँड डेव्हलपर्सच्या या उपक्रमाचे कौतुक केले.

वारकरी संप्रदायातील सेवा, भक्ती आणि सहकार्य यांचे दर्शन या उपक्रमाच्या माध्यमातून घडले. सुनील चव्हाण आणि त्यांच्या टीमचे या उपक्रमासाठी परिसरातून विशेष अभिनंदन होत आहे.