गावगाथा

अभिजीत राणे फाउंडेशन तर्फे माझी आई विषयावर राज्यस्तरीय कविता स्पर्धा

कविता स्पर्धा

अभिजीत राणे फाउंडेशन तर्फे माझी आई विषयावर राज्यस्तरीय कविता स्पर्धा

आई सारखे दैवत या जगामध्ये नाही, स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. प्रत्येकाला आपली आई प्रिय असते.आपल्या आईवरील प्रेम व्यक्त करण्यासाठी अभिजित राणे युथ फाउंडेशन महाराष्ट्र राज्य या संस्थेच्या वतीने माझी आई या विषयावर राज्यस्तरीय कविता स्पर्धा आयोजित करण्यात आली असून १० वर्षांवरील कोणताही स्पर्धक या स्पर्धेत सहभागी होऊ शकतो.स्पर्धकाने सुवाच्च अक्षरात स्वलिखित किमान १२ ओळी आणि जास्तीत जास्त २० ओळीत आपली कविता स्पीड पोस्ट किंवा कुरिअर द्वारे स्पर्धा प्रमुख गणेश हिरवे २/१२ पार्वती निवास रामनगर वांद्रेकरवाडी जोगेश्वरी पूर्व मुंबई ४०००६० या ठिकाणी १० जून २०२४ पर्यंत पोहचतील अशा रीतीने पाठविणे आवश्यक आहे.कोणतीही कविता ऑनलाईन स्वीकारली जाणार नाही.परीक्षकांचा निर्णय अंतिम राहील.पहिल्या तीन विजेत्यांना अनुक्रमे २००१/- १५०१/- १००१
/- रोख पारितोषिक आणि सन्मानचिन्ह, सन्मानपत्र देऊन गौरविण्यात येईल.सहभागी सर्व स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात येईल.अधिक माहितीसाठी ९९२०५८१८७८ संपर्क साधावा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button