गावगाथा

बसवकल्याण क्षेत्र समितीची राज्यस्तरीय बैठक २ ऑगस्ट रोजी सोलापुरात

बैठक

बसवकल्याण क्षेत्र समितीची राज्यस्तरीय बैठक २ ऑगस्ट रोजी सोलापुरात
बसवकल्याण : बसवकल्याण क्षेत्र समिती, महाराष्ट्र राज्य यांची बैठक क्रमांक ४ रविवार, दि. २ ऑगस्ट २०२६ रोजी सोलापुरात आयोजित करण्यात आली आहे. ही बैठक मातोश्री सिद्धव्वाबाई हत्तुरे मंगल कार्यालय, हत्तुरे नगर, सोलापूर विमानतळ समोर, होटगी रोड, मजरेवाडी येथे सकाळी १० वाजता होणार असल्याची माहिती समितीचे प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी परिवहन सभापती विजयकुमार हत्तुरे यांनी दिली.
महात्मा बसवेश्वर यांची कर्मभूमी असलेली कर्नाटक राज्यातील बिदर जिल्हातील बसवकल्याण येथे बसवकल्याण क्षेत्र समिती यांचे केंद्रीय समितीची बैठक पार पडली. केंद्रीय समितीचे मुख्य संयोजक माजी खासदार बसवराज पाटील मॅडम यांच्या अध्यक्षतेखाली तर प्रमुख मार्गदर्शक डॉ. गंगांबिका अक्का बसवगिरी शरणो उद्यान,बिदर, महाराष्ट्राचे प्रभारी माजी अधिष्ठता डॉ. अमरनाथ सोलपुरे, निवृत्त न्यायाधीश तसेच सुभाषचंद्र नागराळे, ज्येष्ठ साहित्यिक सोमनाथ याळवार हुमनाबाद, डॉ. महेश पाटील सहाय्यक आयुक्त कर विभाग कलबुर्गी, लातूरचे प्रा. सुनील हेंगणे,महाराष्ट्राचे प्रदेश उपाध्यक्ष विजयकुमार हत्तुरे, डॉ. देविका नागरे, कावेरी पाटील, यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. या बैठकीत विविध विषयावर चर्चा करून पुढील बैठक सोलापूर घेण्याचे एकमताने ठरवण्यात आले.
सोलापूर येथे होणाऱ्या बैठकीत बसवकल्याण नगरीला भेट देणाऱ्या पर्यटकांसाठी मार्गदर्शन, दासोह व निवास व्यवस्था, नूतन अनुभव मंटपाची संरचनात्मक माहिती, बसव भारत उत्सव २०२७ चे नियोजन तसेच बसवकल्याण क्षेत्र समितीच्या विविध उपक्रमांवर सविस्तर चर्चा करण्यात येणार आहे.
याशिवाय १ लाख ९६ हजार शरण-शरणींच्या इष्टलिंग पूजेचे नियोजन, भाविकांसाठी उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या सुविधांची माहिती, सांस्कृतिक कार्यक्रम व विविध स्पर्धांच्या नियोजनाचा आराखडा तसेच दि. २३ ते २७ डिसेंबर २०२७ दरम्यान होणाऱ्या कार्यक्रमांच्या वेळापत्रकावर विचारविनिमय करण्यात येणार आहे.
बैठकीनंतर दुपारी १ ते २ या वेळेत स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले आहे. राज्यातील सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, समाजबांधव आणि बसवप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून बैठकीस यशस्वी करावे, असे आवाहन बसवकल्याण क्षेत्र समितीचे प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी परिवहन सभापती विजयकुमार हत्तुरे यांनी केले आहे. यावेळी सोलापूर जिल्हा अध्यक्ष बसवराज दिंडोरे शहराध्यक्ष चन्नप्पा गुरुभेटटी, सकलेश बाबुळगावकर, सिद्धाराम कटारे, नामदेव फुलारी, नागेश पडणूरे, श्रीशैल पॅडशिंगे, सिद्धाराम तांबुळे आदी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button