अँड.प्रा.सदाशिव माळगे यांना ‘डॉ. कलाम राष्ट्र उभारणी प्रेरणा पुरस्कार-२०२६’ प्रदान
पुणे : भारताचे माजी राष्ट्रपती, भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित राज्यस्तरीय सोहळ्यात अक्कलकोट तालुक्यातील आळगे गावचे सुपुत्र अँड. प्रा. सदाशिव माळगे यांना ‘डॉ. कलाम राष्ट्र उभारणी प्रेरणा पुरस्कार-२०२६’ प्रदान करून गौरविण्यात आले.
ड्रीम फाऊंडेशन, डॉ. कलाम कौशल्य विकास केंद्र, पुणे, चाणक्य गुरुकुल अकॅडमी आणि बसव संगम शेतकरी गट यांच्या संयुक्त विद्यमाने पुण्यातील मराठा चेंबर्स ऑफ कॉमर्स, हडपसर पुणे येथे हा भव्य पुरस्कार सोहळा संपन्न झाला.
या कार्यक्रमाचे उद्घाटन माजी डीआरडीओ वरिष्ठ वैज्ञानिक डॉ. अशोक जी. नगरकर यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. सुजित धर्माधिकारी (संचालक, एमआयटी पुणे) होते. विविध क्षेत्रातील मान्यवर, उद्योजक, शिक्षणतज्ज्ञ, सामाजिक कार्यकर्ते आणि पुरस्कार विजेते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अँड. प्रा.सदाशिव माळगे यांनी शिक्षण, पत्रकारिता, समाजसेवा आणि युवकांमध्ये सामाजिक जाणीव निर्माण करण्यासाठी सातत्याने केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत हा प्रतिष्ठेचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन, सामाजिक प्रबोधन आणि विविध शैक्षणिक उपक्रमांमधील त्यांचे योगदान विशेष उल्लेखनीय मानले जाते.
पुरस्कार स्वीकारल्यानंतर अँड. प्रा. माळगे यांनी हा सन्मान आपल्या कुटुंबीय, गुरुजन, सहकारी आणि समाजातील सर्व हितचिंतकांना समर्पित करत, भविष्यातही समाजहिताची कार्ये अधिक जोमाने सुरू ठेवण्याचा संकल्प व्यक्त केला.
या गौरवाबद्दल अक्कलकोट तालुक्यासह आळगे गावातील ग्रामस्थ, विविध सामाजिक, शैक्षणिक, पत्रकार आणि राजकीय क्षेत्रातील मान्यवरांकडून अँड. प्रा. सदाशिव माळगे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
Back to top button
×
No WhatsApp Number Found!